या प्रशिक्षणामध्ये उद्योग व्यवसायाची योग्य निवड, बाजारपेठेचा अभ्यास, प्रकल्प अहवाल (Project Report) तयार करणे, बँक कर्ज प्रस्ताव तयार करणे, MSME नोंदणी, विविध शासकीय अनुदान व कर्ज योजनांची माहिती, डिजिटल मार्केटिंग, ब्रँडिंग, पॅकेजिंग, GST, व्यवसायासाठी आवश्यक परवाने तसेच आर्थिक नियोजन या विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेकडून जालना जिल्ह्यातील लक्षित गटातील युवक-युवतींसाठी विशेष उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम (EDP) दि. ३० जुलै २०२६ पासून सुरू करण्यात येणार आहे. स्वयंरोजगाराला चालना देऊन युवक-युवतींना सक्षम उद्योजक बनविण्याच्या उद्देशाने हा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या प्रशिक्षणामध्ये उद्योग व्यवसायाची योग्य निवड, बाजारपेठेचा अभ्यास, प्रकल्प अहवाल (Project Report) तयार करणे, बँक कर्ज प्रस्ताव तयार करणे, MSME नोंदणी, विविध शासकीय अनुदान व कर्ज योजनांची माहिती, डिजिटल मार्केटिंग, ब्रँडिंग, पॅकेजिंग, GST, व्यवसायासाठी आवश्यक परवाने तसेच आर्थिक नियोजन या विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम अमृतच्या लक्षित गटातील पात्र युवक-युवती, नवउद्योजक, महिला उद्योजिका तसेच ग्रामीण व शहरी भागातील स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असलेल्या इच्छुकांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
अमृत या संस्थेकडून लक्षित गटातील युवक-युवतींना रोजगार व स्वयंरोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने विविध कौशल्य विकास व उद्योजकता विकास उपक्रम राबविले जात आहेत. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून युवक-युवतींनी नोकरी मागणारे न राहता रोजगार निर्माण करणारे सक्षम उद्योजक बनावे, असे आवाहन अमृत या संस्थेकडून करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी :
अमृत जिल्हा कार्यालय
दुसरा मजला, प्रशासकीय इमारत,
जिल्हाधिकारी कार्यालय, जालना.
मो. : ७३९१०६५४७४ अमृत संस्थेविषयी - महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कोणत्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही, अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सर्वांगीण सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी कार्यरत आहे. अमृतच्या लक्षित गटामध्ये ब्राह्मण, सिंधी, हिंदू मारवाडी, गुजराती, पटेल, राजपूत, राजपुरोहित, हिंदू नेपाळी, बनिया, कम्मा, कायस्थ, अय्यंगार, नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, भूमिहार, येलमार, ठाकूर, त्यागी, सेनगूनथर, जाट, कानबी आणि कोमटी/वैश्य आदी जातींचा समावेश आहे. या जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेले नागरिक अमृतच्या विविध योजना व प्रशिक्षण कार्यक्रमांचा लाभ घेऊ शकतात. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment