चाळीसगाव (जळगाव ) येथे ई डी पी बॅचचे उद्घाटन संपन्न

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात अमृत संस्थेद्वारे आयोजित केलेल्या ईडीपीच्या बॅच मध्ये १६ लाभार्थी या प्रशिक्षणाचा लाभ घेत आहेत,.

चाळीसगाव (जळगाव ) येथे ई डी पी बॅचचे उद्घाटन संपन्न मुख्य फोटो
चाळीसगाव (जळगाव ) येथे ई डी पी बॅचचे उद्घाटन संपन्न अतिरिक्त फोटो

लक्षित समाजाने अमृतच्या विविध योजनांद्वारे प्रशिक्षण घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करावा व स्वतःच नोकरी देणारे व्हावे या उद्देशाने अमृतच्या माध्यमातून ई डी पी चा दहा दिवसीय प्रोग्राम जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात सुरु झाला आहे.नुकताच त्याचा शुभारंभ करण्यात आला. लक्षित समाजाच्या काही मान्यवरांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी पाहुण्यांचे स्वागत जिल्हा व्यवस्थापक व अमृतमित्र यांनी केले. याप्रसंगी लक्षित समाजाच्या प्रतिनिधींना वारीचा अंक हे ( पुस्तक )देऊन केले .समाजाच्या प्रत्येक प्रमुखांनी आपल्या उद्घाटन पर भाषणात सांगितले की जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी प्रशिक्षण घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करावा.

या प्रशिक्षणासाठी १६ लाभार्थी प्रशिक्षण घेत असून त्यांनी नवीन व्यवसाय सुरू करण्याचा संकल्प केला आहे. अमृतच्या वैयक्तिक व्याज परताव्या सारख्या योजनांचा लाभ घेऊन हे प्रशिक्षणार्थी नक्कीच आपला व्यवसाय सुरु करतील. "या अमृत लाभार्थ्यांनी स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी जिद्द व चिकाटी बाळगली तर व्यवसायात हमखास यश व वृद्धी प्राप्त होईल", असे अग्रवाल समाजाचे श्री गोपाल शेठ अग्रवाल यांनी आपल्या शुभेच्छापर भाषणात सांगितले.

राजपूत समाजाचे श्री मोहन सिंग पवार करणी सेना उत्तर महाराष्ट्र मार्गदर्शक यांनी आपल्या स्वागत पर शुभेच्छा व भाषणात सांगितले की," या योजनेअंतर्गत फळांचा उद्योगही यातील काही लोकांनी केला तर विशिष्ट समाजाचा फळ उद्योगात असलेला दबदबा कमी होईल व आपली माणसं आर्थिक उन्नती करु शकतील व या योगे आपण आपल्या जवळच्या चार लोकांना रोजगार प्राप्त करून देऊ शकतो",असे त्यांनी सांगितले

श्री मंदार पाठक यांनी आपल्या शुभेच्छा पर भाषणात थोडक्यात सांगितले की," या योजनेअंतर्गत जर आपणास काही कागदपत्र व आर्थिक तरतुदी बाबत मार्गदर्शन लागले तर त्यांचे सहकार्य अवश्य मिळेल".

यावेळी जनता जळगाव जनता सहकारी बँकेचे चाळीसगाव शाखेचे लोन इन्चार्ज श्री गिरीश टाकणे यांनी बँकेच्या वेगवेगळ्या योजना व कागदपत्रांबाबत सविस्तर चर्चा केली व लाभार्थ्यांना प्रश्न उत्तराच्या सहाय्याने मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने झाली. अमृत जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र कानडे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले .

सर्वांनी चहापानाचा आस्वाद घेतला, या कार्यक्रमासाठी अमृत मित्र विनोद देशपांडे व लक्षित समाजाच्या युवकांनी विशेष सहकार्य केले.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Rajendra Kanade News publisher name | Date: 25-07-2026 News publication date | Time: 06:34 PM News publication time | Views: 57 Number of times this news has been viewed | District: Jalgaon Related district of the news
Publisher: Rajendra Kanade News publisher name | Date: 25-07-2026 News publication date | Time: 06:34 PM News publication time | Views: 57 Number of times this news has been viewed | District: Jalgaon Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement