कोल्हापूर गांधीनगर येथे अमृतच्या 'ग्लॅमर बॅच'चा यशस्वी समारोप; प्रशिक्षणार्थींना शासनमान्य प्रमाणपत्रांचे वितरण

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील युवतींना रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अमृत जिल्हा कार्यालयाच्या वतीने गांधीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या 'ग्लॅमर बॅच' प्रशिक्षणाचा यशस्वी समारोप नुकताच पार पडला.

कोल्हापूर गांधीनगर येथे अमृतच्या 'ग्लॅमर बॅच'चा यशस्वी समारोप; प्रशिक्षणार्थींना शासनमान्य प्रमाणपत्रांचे वितरण मुख्य फोटो
कोल्हापूर गांधीनगर येथे अमृतच्या 'ग्लॅमर बॅच'चा यशस्वी समारोप; प्रशिक्षणार्थींना शासनमान्य प्रमाणपत्रांचे वितरण अतिरिक्त फोटो

अमृत (Academy of Maharashtra Research, Upliftment and Training) ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील युवक-युवती, महिला, विद्यार्थी, उद्योजक व बेरोजगारांसाठी कौशल्य विकास, रोजगाराभिमुख प्रशिक्षण, उद्योजकता विकास, शैक्षणिक मार्गदर्शन, स्वयंरोजगार प्रोत्साहन, व्याज परतावा योजना तसेच विविध शासकीय योजनांबाबत जनजागृतीचे कार्य करत आहे.

​गांधीनगर येथे आयोजित या ग्लॅमर बॅचमध्ये सहभागी प्रशिक्षणार्थींना व्यक्तिमत्त्व विकास, व्यावसायिक ग्रूमिंग, संवाद कौशल्य, मुलाखत तयारी, ग्राहक सेवा, आत्मविश्वास वाढ आणि रोजगारासाठी आवश्यक कौशल्यांचे सखोल प्रशिक्षण देण्यात आले. IG Computer Education च्या तज्ज्ञ प्रशिक्षकांनी विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन करून सहभागींच्या व्यावसायिक कौशल्यांचा विकास घडवून आणला.

​समारोप कार्यक्रमात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सर्व प्रशिक्षणार्थींना शासनमान्य प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी प्रशिक्षणार्थींचे अभिनंदन करत, या प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञान व कौशल्यांचा उपयोग करून रोजगार, स्वयंरोजगार आणि करिअरच्या विविध संधींचा लाभ घेण्याचे आवाहन केले.तसेच सदर कार्यक्रमात अमृत जिल्हा व्यवस्थापक कोल्हापूर यांनी अमृतच्या विविध योजना व त्यासाठी लागणारी कागतपत्रे याविषयी माहिती सांगितली .

​अमृतच्या माध्यमातून राज्यभर विविध कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून, युवक-युवतींना रोजगारक्षम बनविण्यासाठी संस्थेचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. भविष्यातही अशाच प्रकारचे रोजगाराभिमुख प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करून अधिकाधिक युवक-युवतींना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/




Publisher: Abhijeet Kulkarni News publisher name | Date: 25-07-2026 News publication date | Time: 10:42 AM News publication time | Views: 36 Number of times this news has been viewed | District: Kolhapur Related district of the news
Publisher: Abhijeet Kulkarni News publisher name | Date: 25-07-2026 News publication date | Time: 10:42 AM News publication time | Views: 36 Number of times this news has been viewed | District: Kolhapur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement