आषाढी एकादशीनिमित्त बालवारकऱ्यांनी अनुभवली वारीची परंपरा

आषाढी एकादशीनिमित्त रायझिंग स्टार किड्स स्कूलमध्ये अमृत कार्यालयाच्या वतीने वारकरी संस्कृतीवर आधारित विशेष उपक्रम उत्साहात पार पडला. वारकरी वेशभूषेत सहभागी होत छोट्या वारकऱ्यांची दिंडी काढली.

आषाढी एकादशीनिमित्त बालवारकऱ्यांनी अनुभवली वारीची परंपरा मुख्य फोटो
आषाढी एकादशीनिमित्त बालवारकऱ्यांनी अनुभवली वारीची परंपरा अतिरिक्त फोटो

छत्रपती संभाजीनगर : आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने रायझिंग स्टार किड्स स्कूलमध्ये अमृत कार्यालयाच्या वतीने वारकरी संस्कृतीची ओळख करून देणारा विशेष संस्कारमय उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमाचे आयोजन अमृत सखी सौ. मंजू कुलकर्णी यांनी केले.

या प्रसंगी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा परिधान करून छोट्या वारकऱ्यांची दिंडी काढली. हरिनामाच्या गजरात, टाळ-मृदुंगाच्या निनादात निघालेल्या या दिंडीमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी मंदिरात जाऊन श्री विठ्ठल-रुक्मिणीची पूजा व आरती केली आणि भक्तिभावाने दर्शन घेतले.

उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना वारी, दिंडी आणि फुगडीचे धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक महत्त्व अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी फुगडी खेळत पारंपरिक संस्कृतीचा आनंद लुटला.

उपक्रमाच्या शेवटी अमृत टीमच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना फळांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वारकरी परंपरा, भारतीय संस्कृती, भक्ती, सामूहिकता आणि संस्कार यांची जपणूक करण्याची प्रेरणा मिळाली.

शाळेतील मुख्याध्यापिका,शिक्षिका , कर्मचाऱ्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत, विद्यार्थ्यांमध्ये संस्कार आणि सांस्कृतिक मूल्ये रुजविणाऱ्या अशा उपक्रमांची आजच्या काळात नितांत आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित हा उपक्रम विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी अविस्मरणीय ठरला.

आपल्या परिसरात किंवा शाळेत अमृत वर्गाच्या आयोजनासाठी अमृत जिल्हा कार्यालयास संपर्क साधावा,असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/




Publisher: Manju Kulkarni News publisher name | Date: 25-07-2026 News publication date | Time: 01:12 PM News publication time | Views: 36 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news
Publisher: Manju Kulkarni News publisher name | Date: 25-07-2026 News publication date | Time: 01:12 PM News publication time | Views: 36 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement