पुणे येथे महाराष्ट्र ब्राह्मण सभेच्या पदाधिकारी मेळाव्यात अमृतच्या योजनांची सविस्तर माहिती; उद्योजकता व कौशल्य विकासासाठी लाभ घेण्याचे आवाहन

पुणे येथे महाराष्ट्र ब्राह्मण सभेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित प्रदेश पदाधिकारी मेळाव्यात अमृत (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) संस्थेच्या विविध योजना, कौशल्य विकास, उद्योजकता आणि स्वयंरोजगार उपक्रमांची माहिती देण्यात आली.

पुणे येथे महाराष्ट्र ब्राह्मण सभेच्या पदाधिकारी मेळाव्यात अमृतच्या योजनांची सविस्तर माहिती; उद्योजकता व कौशल्य विकासासाठी लाभ घेण्याचे आवाहन मुख्य फोटो
मुख्य फोटो

महाराष्ट्र ब्राह्मण सभेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या प्रदेश पदाधिकारी मेळाव्यात अमृत (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) संस्थेच्या विविध लोकाभिमुख योजना, कौशल्य विकास, स्वयंरोजगार आणि उद्योजकता विकास उपक्रमांची प्रभावी मांडणी करण्यात आली. राज्यभरातून उपस्थित असलेल्या पदाधिकारी, समाजसेवक आणि कार्यकर्त्यांनी या मार्गदर्शन सत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद देत अमृतच्या उपक्रमांचे कौतुक केले. या प्रसंगी अमृतच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उद्योजकता विकास, कौशल्य प्रशिक्षण, स्वयंरोजगार निर्मिती, शासनाच्या विविध कल्याणकारी योजना तसेच युवक, महिला आणि उद्योजकांसाठी उपलब्ध असलेल्या संधींची सविस्तर माहिती देण्यात आली. समाजातील अधिकाधिक नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी जनजागृतीची भूमिका प्रभावीपणे पार पाडावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. अमृतचे पुणे जिल्हा व्यवस्थापक सिद्धेश केसकर यांनी संस्थेच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या कार्याचा आढावा घेत अमृतच्या माध्यमातून राज्यभर राबविण्यात येणाऱ्या नावीन्यपूर्ण योजना, प्रशिक्षण कार्यक्रम आणि रोजगाराभिमुख उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. बदलत्या काळात कौशल्य विकास आणि स्वयंरोजगार हेच आत्मनिर्भरतेचे प्रभावी साधन असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. तसेच, ब्राह्मण समाजातील युवक, महिला आणि इच्छुक उद्योजकांनी अमृतच्या योजनांचा लाभ घेऊन स्वतःचे उद्योग उभारावेत, रोजगाराच्या नव्या संधी निर्माण कराव्यात आणि शासनाच्या विविध योजनांशी जोडले जावे, असे आवाहन त्यांनी केले. मार्गदर्शनानंतर उपस्थित पदाधिकारी आणि समाज कार्यकर्त्यांनी विविध योजनांबाबत प्रश्न विचारत उत्सुकता व्यक्त केली. अमृतच्या उपक्रमांची अंमलबजावणी समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. अमृतच्या योजनांमुळे राज्यातील युवक, महिला आणि उद्योजकांना कौशल्य, रोजगार आणि उद्योग क्षेत्रात नवी दिशा मिळत असून, अशा जनजागृतीपर कार्यक्रमांमुळे शासनाच्या योजनांचा लाभ समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याच्या अमृतच्या ध्येयाला अधिक बळ मिळत असल्याचे या मेळाव्यात अधोरेखित झाले. "समाजाच्या प्रगतीसाठी कौशल्य, रोजगार आणि उद्योजकता हा अमृतचा मंत्र असून, प्रत्येक इच्छुक व्यक्तीने या योजनांचा लाभ घेऊन आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करावी,"असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/


Publisher: Sheetal Kulkarni News publisher name | Date: 25-07-2026 News publication date | Time: 12:27 PM News publication time | Views: 57 Number of times this news has been viewed | District: Pune Related district of the news
Publisher: Sheetal Kulkarni News publisher name | Date: 25-07-2026 News publication date | Time: 12:27 PM News publication time | Views: 57 Number of times this news has been viewed | District: Pune Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement