महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या उद्योजक आणि स्टार्टअप्सनी 'Our Participants – Demo Day 2026' मध्ये आपल्या नाविन्यपूर्ण व्यवसाय संकल्पना आणि तंत्रज्ञानाधारित उपाय सादर करत उद्योगक्षेत्राचे लक्ष वेधून घेतले.
महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या उद्योजक आणि स्टार्टअप्सनी 'Our Participants – Demo Day 2026' मध्ये आपल्या नाविन्यपूर्ण व्यवसाय संकल्पना आणि तंत्रज्ञानाधारित उपाय सादर करत उद्योगक्षेत्राचे लक्ष वेधून घेतले. COEP's Bhau Institute आणि MSSU iSPARK Foundation यांच्या सहकार्याने आयोजित या उपक्रमात अमृतच्या प्रशिक्षणातून घडलेल्या अनेक स्टार्टअप्सना आपले नवकल्पनात्मक प्रकल्प गुंतवणूकदार, उद्योगतज्ज्ञ आणि मार्गदर्शकांसमोर सादर करण्याची संधी मिळाली. या डेमो डे मध्ये कृषी, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), अन्नप्रक्रिया, डिजिटल तंत्रज्ञान, हेल्थटेक, शिक्षण, सस्टेनेबिलिटी आणि सेवा क्षेत्रातील विविध स्टार्टअप्सनी आपल्या उत्पादनांचे आणि सेवांचे सादरीकरण केले. व्यवसायातील नावीन्य, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि समाजोपयोगी कल्पना यामुळे उपस्थित मान्यवरांनी या स्टार्टअप्सचे विशेष कौतुक केले. अमृतच्या माध्यमातून उद्योजकता विकास, कौशल्यविकास, व्यवसाय नियोजन, बाजारपेठेतील संधी, वित्तीय व्यवस्थापन, ब्रँडिंग आणि स्टार्टअप मार्गदर्शन अशा विविध विषयांवर प्रशिक्षण घेणाऱ्या उद्योजकांनी या व्यासपीठावर आत्मविश्वासाने आपले प्रकल्प मांडले. या प्रक्रियेमुळे नवउद्योजकांना गुंतवणूक, उद्योग सहकार्य, मार्गदर्शन आणि बाजारपेठ विस्ताराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. डेमो डे मध्ये सहभागी झालेल्या स्टार्टअप्समध्ये AlgAevity, Ksham Innovation, Vardhinie Biomarket, AdHSV, Agati, EveryTS, Krushi Aadhaar, IT Studio, BrainTech, ARA Technologies, Clarifier, Wood4, Eatsy, Shastratva Technologies, Eat Epic, Vantra यांसारख्या विविध क्षेत्रातील नवउद्योजकांचा समावेश होता. या सर्व स्टार्टअप्सनी आपल्या कल्पना आणि उत्पादनांच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण उद्योजकतेचे प्रभावी दर्शन घडवले. अमृतचे उद्दिष्ट केवळ प्रशिक्षण देणे नसून, प्रशिक्षणार्थ्यांना उद्योगविश्वाशी जोडणे, त्यांना प्रत्यक्ष व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देणे आणि रोजगारनिर्मितीला चालना देणे हे आहे. 'डेमो डे 2026' सारख्या व्यासपीठांमुळे नवउद्योजकांना त्यांच्या संकल्पना प्रत्यक्ष गुंतवणूकदार आणि उद्योगतज्ज्ञांसमोर मांडण्याची संधी मिळत असून, त्यातून उद्योग उभारणीचा आत्मविश्वास आणि व्यावसायिक नेटवर्क अधिक मजबूत होत आहे. यावेळी उपस्थित उद्योगतज्ज्ञांनी अमृतच्या उपक्रमाचे कौतुक करत, राज्यातील नवउद्योजकांना अशा संधी सातत्याने उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त केली. स्टार्टअप इंडिया आणि आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी अमृतसारख्या संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचेही त्यांनी नमूद केले. 'Our Participants – Demo Day 2026' हा कार्यक्रम केवळ स्टार्टअप्सचे सादरीकरण नसून, नवकल्पना, उद्योग, संशोधन आणि उद्योजकता यांचा प्रभावी संगम ठरला. अमृतच्या माध्यमातून घडणाऱ्या उद्योजकांसाठी हा कार्यक्रम भविष्यातील व्यवसायवृद्धी, गुंतवणूक आणि राष्ट्रीय स्तरावर विस्ताराची नवी दारे उघडणारा ठरल्याची भावना सहभागी उद्योजकांनी व्यक्त केली.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment