श्रीमंत बाजीराव पेशवे जयंतीनिमित्त ‘पराक्रम दिन’ पोस्टरचे अनावरण

श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त अमृत संस्थेमार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या ‘पराक्रम दिन’ उपक्रमाच्या पोस्टरचे अनावरण परभणी जिल्हा कार्यालयात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

श्रीमंत बाजीराव पेशवे जयंतीनिमित्त ‘पराक्रम दिन’ पोस्टरचे अनावरण मुख्य फोटो
मुख्य फोटो

परभणी : श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त अमृत संस्थेमार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या ‘पराक्रम दिन’ उपक्रमाच्या पोस्टरचे अनावरण परभणी जिल्हा कार्यालयात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी उपस्थितांना ‘पराक्रम दिन’ उपक्रमाची संकल्पना, उद्दिष्टे तसेच युवकांमध्ये राष्ट्रप्रेम, शौर्य, नेतृत्व आणि इतिहासाबद्दल अभिमानाची भावना जागृत करण्यामागील उद्देश याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. समाजात प्रेरणादायी विचारांची जोपासना करणारा हा उपक्रम निश्चितच प्रभावी ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

उपस्थित मान्यवरांनी अमृत संस्थेच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक करत त्याच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच ‘पराक्रम दिन’ उपक्रमास शुभेच्छा देत अशा प्रेरणादायी उपक्रमांची समाजात नितांत आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.

या प्रसंगी श्री. योगेश जोशी सोनपेठकर (शासकीय कंत्राटदार), श्री. दीपकजी कासांडे (जिल्हा अध्यक्ष पेशवा संघटना परभणी), श्री. रोहितजी कनकदंडे (जनसूर्य सामाजिक प्रतिष्ठान), श्री. आनंदजी शांडिल्य, श्री. अनंत टिकोळे, श्री. दत्तात्रय कुलकर्णी, श्री. विश्वास जोशी (बँक अधिकारी, वैश्य नागरी सहकारी बँक लि., परभणी), अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक अनिरुद्ध काटे, उपव्यवस्थापक रवि कुलकर्णी, अमृत मित्र अनंतराव जोगदंड तसेच अमृत सखी मयुरी टेळकीकर आदी उपस्थित होते.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/


Publisher: Anirudha Kate News publisher name | Date: 23-07-2026 News publication date | Time: 02:45 PM News publication time | Views: 156 Number of times this news has been viewed | District: Parbhani Related district of the news
Publisher: Anirudha Kate News publisher name | Date: 23-07-2026 News publication date | Time: 02:45 PM News publication time | Views: 156 Number of times this news has been viewed | District: Parbhani Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement