आर्वी येथे ‘अमृत संवाद सेतू’ उपक्रमाच्या पूर्वतयारीला वेग; शासकीय अधिकारी व शैक्षणिक संस्थांची सकारात्मक साथ

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने २४ जुलै रोजी आर्वी तहसील कार्यालयात आयोजित करण्यात येणाऱ्या ‘अमृत संवाद सेतू’ उपक्रमाच्या पूर्वतयारीसाठी तहसीलदार हरीश काळे, उपविभागीय दंडाधिकारी विश्वास शिरसाट तसेच गांधी विद्यालयाचे प्राचार्य विश्वेश्वर पायले यांची भेट घेण्यात आली. यावेळी उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी सहकार्याबाबतचे पत्र देऊन उपक्रमाची सविस्तर माहिती देण्यात आली. गांधी विद्यालयाने या उपक्रमासाठी २५ ते ३० विद्यार्थिनी सहभागी करून देण्यास सहमती दर्शविली.

आर्वी येथे ‘अमृत संवाद सेतू’ उपक्रमाच्या पूर्वतयारीला वेग; शासकीय अधिकारी व शैक्षणिक संस्थांची सकारात्मक साथ मुख्य फोटो
मुख्य फोटो

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने २४ जुलै रोजी आर्वी तहसील कार्यालयात आयोजित करण्यात येणाऱ्या ‘अमृत संवाद सेतू’ उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पूर्वतयारीला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर विविध शासकीय अधिकारी व शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींच्या भेटी घेऊन उपक्रमासाठी सहकार्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी आर्वीचे तहसीलदार हरीश काळे यांची भेट घेऊन अमृतच्या वतीने उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी सहकार्याबाबतचे पत्र देण्यात आले. तसेच उपक्रमाची उद्दिष्टे, स्वरूप आणि विद्यार्थ्यांना होणारे शैक्षणिक व व्यावहारिक लाभ यांची माहिती देण्यात आली. तहसील कार्यालयामार्फत विद्यार्थ्यांना प्रशासनाची कार्यपद्धती प्रत्यक्ष अनुभवता यावी, यासाठी या उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर उपविभागीय दंडाधिकारी विश्वास शिरसाट यांची भेट घेऊन त्यांनाही सहकार्याबाबतचे पत्र देण्यात आले. ‘अमृत संवाद सेतू’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शासकीय कार्यालयांची कार्यपद्धती, विविध विभागांचे कामकाज, नागरिकांना उपलब्ध असलेल्या शासकीय सेवा तसेच प्रशासनाशी प्रभावी संवाद साधण्याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यानंतर गांधी विद्यालय, आर्वी येथे भेट देऊन विद्यालयाचे प्राचार्य विश्वेश्वर पायले यांना उपक्रमासंदर्भातील सहकार्याबाबतचे पत्र देण्यात आले. यावेळी अमृत संस्थेच्या कार्याची माहिती देत अमृतच्या लक्ष्यित गटासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, कौशल्य विकास प्रशिक्षण, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच ‘अमृत संवाद सेतू’ या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना शासकीय कार्यालयांची ओळख, विविध विभागांच्या कार्यपद्धतीची माहिती, अर्ज व निवेदन लेखन, पाठपुरावा प्रक्रिया, माहितीचा अधिकार, ऑनलाईन शासकीय सेवा, नागरिकांची जबाबदारी आणि प्रशासनाशी प्रभावी संवाद यांसारख्या विषयांवर प्रत्यक्ष मार्गदर्शन व अनुभव देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. उपक्रमाची माहिती ऐकल्यानंतर प्राचार्य विश्वेश्वर पायले यांनी उपक्रमाचे स्वागत करत सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच विद्यालयातील २५ ते ३० विद्यार्थिनी या उपक्रमात सहभागी करून देण्यास सहमती दर्शविली. विद्यार्थिनींना प्रशासनाची प्रत्यक्ष ओळख करून देणारा आणि त्यांच्यात जबाबदार नागरिकत्वाची जाणीव निर्माण करणारा हा उपक्रम निश्चितच उपयुक्त ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. अमृत संस्थेच्या वतीने राबविण्यात येणारा ‘अमृत संवाद सेतू’ हा उपक्रम विद्यार्थी, युवक आणि नागरिक यांच्यामध्ये शासनाविषयी विश्वास, संवाद आणि जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात येत असून, प्रशासनाशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देणारा हा एक अभिनव उपक्रम असल्याचे यावेळी सांगण्यात आले. अधिक माहितीसाठी संपर्क : ९११२२२७६३२ पत्ता : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) प्रशासकीय भवन, तळमजला, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, सिव्हिल लाईन, वर्धा. अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कोणत्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा समावेश आहे. या जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्तींना अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेता येतो. राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये कार्यरत असून, अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच अमृत संस्थेच्या संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी. संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in

Publisher: Dhiraj Rathi News publisher name | Date: 22-07-2026 News publication date | Time: 05:21 PM News publication time | Views: 121 Number of times this news has been viewed | District: Wardha Related district of the news
Publisher: Dhiraj Rathi News publisher name | Date: 22-07-2026 News publication date | Time: 05:21 PM News publication time | Views: 121 Number of times this news has been viewed | District: Wardha Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement