सन्मित्र मंडळ, गोगटेवाडी रस्ता, आरे सबवे जवळ, आरे रोड, गोरेगाव पूर्व, मुंबई येथे अमृतपेठचे दि. २५ आणि २६ जुलै २०२६ रोजी आयोजन करण्यात आले आहे.
स्वदेशीला प्रोत्साहन देण्यासाठी "अमृतपेठ बाजारपेठ" २५-२६ जुलैला गोरेगावमध्ये
उद्योजकांना संधी आणि नागरिकांना स्वदेशी उत्पादने एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अमृत तर्फे "अमृतपेठ थेट बाजारपेठ" चे आयोजन करण्यात आले आहे.
बाजारपेठ दि. २५ आणि २६ जुलै २०२६ रोजी सन्मित्र मंडळ, गोगटेवाडी रस्ता, आरे सबवे जवळ, आरे रोड, गोरेगाव पूर्व, मुंबई येथे भरवण्यात येणार आहे.
या अमृतपेठचे उद्घाटन दिनांक २५ जुलै रोजी दुपारी ३.०० वाजता होणार असून दोन्ही दिवस (दि. २५ व २६ जुलै) सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत बाजारपेठ सुरू राहील.
बाजारपेठेचा उद्देश:
१. स्थानिक उद्योजक आणि महिला बचत गटांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे
२. नागरिकांना दर्जेदार स्वदेशी उत्पादने थेट उत्पादकांकडून खरेदी करण्याची संधी देणे
३. "वोकल फॉर लोकल" आणि "स्वदेशी" चळवळीला चालना देणे
या बाजारपेठेत हस्तकला, होमेड फूड, कपडे, ज्वेलरी, गृहउद्योग यांचे तीसहून अधिक स्टॉल्स असतील.
खास आकर्षण: दोन्ही दिवस संध्याकाळी ७ वाजता खरेदीदारांसाठी लकी ड्रॉचे आयोजन.
या प्रदर्शन व विक्री कार्यक्रमात मुंबईकरांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
चला एकत्र येऊन स्वदेशीला पाठिंबा देऊया. भारताला आत्मनिर्भर बनवूया.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment