महसूल सहाय्यक अधिकारी सागर राजपूत यांनी अमृत कार्यालयाला दिली भेट

छत्रपती संभाजीनगर (ग्रामीण) तहसील कार्यालयाचे महसूल सहाय्यक अधिकारी श्री. सागर राजपूत यांनी अमृत कार्यालयाला भेट देऊन संस्थेच्या योजना व उपक्रमांची माहिती घेतली.

महसूल सहाय्यक अधिकारी सागर राजपूत यांनी अमृत कार्यालयाला दिली भेट मुख्य फोटो
महसूल सहाय्यक अधिकारी सागर राजपूत यांनी अमृत कार्यालयाला दिली भेट अतिरिक्त फोटो

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या स्वायत्त संस्थेच्या छत्रपती संभाजीनगर विभागीय जिल्हा कार्यालयाला आज सागर राजपूत, महसूल सहाय्यक अधिकारी, तहसील कार्यालय छत्रपती संभाजीनगर (ग्रामीण) यांनी सदिच्छा भेट दिली.


अमृत संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमांची सविस्तर माहिती त्यांना देण्यात आली. रोजगारक्षम कौशल्य विकास, औद्योगिक व उन्नत कौशल्य विकास, व्यक्तिमत्त्व विकास, शैक्षणिक अर्थसहाय्य, उद्योजकांसाठीच्या योजना, स्पर्धा परीक्षा प्रोत्साहन अर्थसहाय्य, अमृतपेठ थेट बाजारपेठ, अमृत पर्यटन, ई-व्ही (EV) चार्जिंग स्टेशन उपक्रम तसेच अमृत वर्ग या उपक्रमांची माहिती त्यांनी जाणून घेतली.


यावेळी अमृतच्या जिल्हा टीमच्या वतीने सागर राजपूत यांचे स्वागत करण्यात आले. अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Rucha S. Sharma News publisher name | Date: 20-07-2026 News publication date | Time: 05:26 PM News publication time | Views: 611 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news
Publisher: Rucha S. Sharma News publisher name | Date: 20-07-2026 News publication date | Time: 05:26 PM News publication time | Views: 611 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement