महावीर महाविद्यालयात 'अमृत' योजनांवर सकारात्मक चर्चा; विद्यार्थी हितासाठी संयुक्त उपक्रमांवर भर

अमृत (AMRUT) कोल्हापूर जिल्हा व्यवस्थापक श्री अभिजीत कुलकर्णी यांनी महावीर महाविद्यालय, कोल्हापूर येथे सदिच्छा भेट देत महाविद्यालयातील प्राध्यापकांशी अमृतच्या विविध योजना, विद्यार्थी विकास उपक्रम आणि भविष्यातील सहकार्याच्या संधी याबाबत सविस्तर चर्चा केली.

महावीर महाविद्यालयात 'अमृत' योजनांवर सकारात्मक चर्चा; विद्यार्थी हितासाठी संयुक्त उपक्रमांवर भर मुख्य फोटो
महावीर महाविद्यालयात 'अमृत' योजनांवर सकारात्मक चर्चा; विद्यार्थी हितासाठी संयुक्त उपक्रमांवर भर अतिरिक्त फोटो

बैठकीदरम्यान अमृतच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी महाविद्यालयाचे सहकार्य मिळावे, तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक, कौशल्य विकास, करिअर मार्गदर्शन आणि शासकीय योजनांची माहिती वेळोवेळी उपलब्ध करून देण्यासाठी संयुक्त उपक्रम राबविण्याबाबत सकारात्मक विचारविनिमय करण्यात आला. महावीर महाविद्यालयातील प्राध्यापकांनी अमृतच्या कार्याची माहिती जाणून घेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अशा उपक्रमांची आवश्यकता व्यक्त केली. भविष्यात महाविद्यालय आणि अमृत कोल्हापूर जिल्हा टीम यांच्या समन्वयातून विद्यार्थ्यांसाठी विविध मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्याबाबतही अनुकूल भूमिका व्यक्त करण्यात आली तसेच होणार असलेल्या अमृत "संवाद सेतू" कार्यक्रमासाठी मुलांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Abhijeet Kulkarni News publisher name | Date: 18-07-2026 News publication date | Time: 02:47 PM News publication time | Views: 64 Number of times this news has been viewed | District: Kolhapur Related district of the news
Publisher: Abhijeet Kulkarni News publisher name | Date: 18-07-2026 News publication date | Time: 02:47 PM News publication time | Views: 64 Number of times this news has been viewed | District: Kolhapur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement