अमृत कार्यालय येथील "उद्योजकता विकास कार्यक्रम" प्रशिक्षणास सुरुवात झाली आहे.योग्य मार्गदर्शन मिळत असल्याने लाभार्थ्यांनी व्यक्त केले समाधान
अहिल्यानगर :-अमृत कार्यालय येथील "उद्योजकता विकास कार्यक्रम" प्रशिक्षणाचा दुसरा दिवस. अहिल्यानगर अमृत संस्थे मार्फत अमृत कार्यालय येथे १५ जुलै ते २५ जुलै अमृत उद्योजकता विकास कार्यक्रम" प्रशिक्षण चे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचा दुसरा दिवस होता. त्यात "सेल्सस्किल्स,नेटवर्किंग व मार्केटिंग- ब्रॅण्डिंग"या विषयी उद्योजक व एक्स्पर्ट मा योगेशजी पळुस्कर यांनी योग्य मार्गदर्शन केले. प्रशिक्षण झाल्यावर लाभार्थी यांनी योग्य प्रशिक्षण मिळाले याबद्दल समाधान व्यक्त केले. अमृत संस्थेतर्फे जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी योगेश पळुस्कर यांचा सत्कार करून मानसन्मान केला व त्यांचे आभार मानले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी,जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार इत्यादी जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व 36 जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/ अमृत जिल्हा कार्यालय संपर्क क्रमांक :- 9112228769 जिल्हा कार्यालय पत्ता : वरुण अपार्टमेंट, आकाशवाणी केंद्र समोर,प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर - 414003
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment