स्वयंरोजगारासाठी सुवर्णसंधी; जालना येथे अमृतचे उद्योजकता विकास (EDP) प्रशिक्षण २७ जुलैपासून

स्वतःचा उद्योग सुरू करायचा किंवा विद्यमान व्यवसायाचा विस्तार करायचा असेल, तर महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे उद्योजकता विकास कार्यक्रम (EDP) आयोजित करण्यात आला आहे.

स्वयंरोजगारासाठी सुवर्णसंधी; जालना येथे अमृतचे उद्योजकता विकास (EDP) प्रशिक्षण २७ जुलैपासून मुख्य फोटो
स्वयंरोजगारासाठी सुवर्णसंधी; जालना येथे अमृतचे उद्योजकता विकास (EDP) प्रशिक्षण २७ जुलैपासून अतिरिक्त फोटो

स्वयंरोजगारासाठी सुवर्णसंधी; अमृतचे उद्योजकता विकास (EDP) प्रशिक्षण २७ जुलैपासून स्वतःचा उद्योग सुरू करायचा किंवा विद्यमान व्यवसायाचा विस्तार करायचा असेल, तर महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे उद्योजकता विकास कार्यक्रम (EDP) आयोजित करण्यात आला आहे. जालना जिल्ह्यातील इच्छुक युवक-युवतींनी दि. २२ जुलै २०२६ पर्यंत नाव नोंदणी करून या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृत जिल्हा कार्यालयाने केले आहे. दि. २७ जुलै २०२६ पासून सुरू होणाऱ्या या १० दिवसांच्या प्रशिक्षणात पहिल्या चार दिवसांत प्रत्यक्ष (ऑफलाइन) तर पुढील सहा दिवस ऑनलाइन मार्गदर्शन दिले जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या सहभागी लाभार्थ्यांना शासकीय प्रमाणपत्र देण्यात येईल. प्रशिक्षणात उद्योग सुरू करण्याची प्रक्रिया, व्यवसाय नियोजन, बँक कर्ज, शासकीय योजना, मार्केटिंग, ब्रँडिंग, आर्थिक नियोजन, व्यवसाय व्यवस्थापन तसेच 'अमृत पेठ' या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे ऑनलाइन विक्रीबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन केले जाणार आहे. अमृत संस्थेच्या योजना खुल्या प्रवर्गातील अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आहेत, ज्यांना शासनाच्या इतर संस्था किंवा महामंडळांच्या योजनांचा लाभ मिळत नाही. वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा कमी असलेले पात्र लाभार्थी या प्रशिक्षणाचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी संपर्क : अमृत जिल्हा कार्यालय, दुसरा मजला, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना. मो.: ७३९१०६५४७४


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/


Publisher: Nitin Khekale News publisher name | Date: 16-07-2026 News publication date | Time: 11:11 AM News publication time | Views: 73 Number of times this news has been viewed | District: Jalna Related district of the news
Publisher: Nitin Khekale News publisher name | Date: 16-07-2026 News publication date | Time: 11:11 AM News publication time | Views: 73 Number of times this news has been viewed | District: Jalna Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement