अमृतच्या योजनांमुळे लाभार्थी होत आहेत स्वावलंबी; लाभार्थी मंच बैठकीत अनुभवांची देवाणघेवाण

छत्रपती संभाजीनगर येथील अमृत जिल्हा कार्यालयात अमृत लाभार्थी मंचाची बैठक उत्साहात पार पडली. अमृतच्या विविध प्रशिक्षणातून व्यवसाय सुरू केलेले तसेच व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत असलेले लाभार्थी या बैठकीत सहभागी झाले होते.

अमृतच्या योजनांमुळे लाभार्थी होत आहेत स्वावलंबी; लाभार्थी मंच बैठकीत अनुभवांची देवाणघेवाण मुख्य फोटो
अमृतच्या योजनांमुळे लाभार्थी होत आहेत स्वावलंबी; लाभार्थी मंच बैठकीत अनुभवांची देवाणघेवाण अतिरिक्त फोटो

छत्रपती संभाजीनगर :


अमृतच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा कार्यालयात अमृत लाभार्थी मंचाची बैठक झाली. अमृतच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण घेतलेले अनेक लाभार्थी या बैठकीला आले होते. काही लाभार्थ्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे, तर काहीजण बँकेचे कर्ज मंजूर होऊन व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत आहेत.


या बैठकीला अमृतचे मराठवाडा विभागीय व्यवस्थापक अमित सामंत, गुजराती समाजाचे अध्यक्ष राजेश मेहता आणि ब्राह्मण महिला मंचाच्या अध्यक्षा विजया कुलकर्णी उपस्थित होत्या.


यावेळी राजेश मेहता यांनी स्वतःच्या उद्योजकतेचा अनुभव सांगत, व्यवसाय करताना कसं नियोजन करायचं? कशी मेहनत घ्यायची? आणि अडचणींवर कशी मात करायची? याबद्दल मार्गदर्शन केलं. ज्यांची बँकेची कर्ज प्रकरणं अडकली आहेत किंवा कर्ज मंजूर व्हायचं बाकी आहे, अशा लाभार्थ्यांना बँकेच्या माध्यमातून शक्य तेवढी मदत करण्याचंही त्यांनी सांगितलं.


बैठकीत अनेक लाभार्थ्यांनी अमृतमुळे आपल्याला प्रशिक्षण, व्यवसायाचं मार्गदर्शन, बँक कर्ज आणि व्याज परतावा योजनेचा फायदा झाल्याचं सांगितलं. अमृतच्या माध्यमातून अनेक तरुण, महिला आणि इच्छुकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सातत्याने मदत केली जात आहे.


यावेळी सगळ्या लाभार्थ्यांनी एकमेकांशी ओळख करून घेतली, आपल्या व्यवसायाचे अनुभव सांगितले आणि पुढेही अशा बैठका होत राहाव्यात, अशी इच्छा व्यक्त केली. जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी अमृत लाभार्थी मंचाशी जोडावं, अमृतच्या योजनांचा फायदा घ्यावा आणि स्वतःचा व्यवसाय उभा करावा, असं आवाहन यावेळी करण्यात आलं.


या बैठकीचं नियोजन अमृतचे जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे, उपव्यवस्थापक योगेश रोडे, अमृत सखी मंजू कुलकर्णी आणि अमृत सखी ऋचा शर्मा यांनी केले.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 15-07-2026 News publication date | Time: 04:17 PM News publication time | Views: 62 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news
Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 15-07-2026 News publication date | Time: 04:17 PM News publication time | Views: 62 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement