कोल्हापूरमध्ये 'अमृत उद्योजकता विकास कार्यक्रम' (EDP) प्रशिक्षण

अमृत संस्थेच्या वतीने खुल्या प्रवर्गातील लक्षित गटातील इच्छुक युवक-युवती, महिला तसेच नवउद्योजकांसाठी 'अमृत उद्योजकता विकास कार्यक्रम' (Entrepreneurship Development Programme - EDP) आयोजित करण्यात आला आहे.

कोल्हापूरमध्ये 'अमृत उद्योजकता विकास कार्यक्रम' (EDP) प्रशिक्षण मुख्य फोटो
कोल्हापूरमध्ये 'अमृत उद्योजकता विकास कार्यक्रम' (EDP) प्रशिक्षण अतिरिक्त फोटो

कोल्हापूर : अमृत संस्थेच्या वतीने खुल्या प्रवर्गातील लक्षित गटातील इच्छुक युवक-युवती, महिला तसेच नवउद्योजकांसाठी 'अमृत उद्योजकता विकास कार्यक्रम' (Entrepreneurship Development Programme - EDP) आयोजित करण्यात आला आहे. स्वयंरोजगाराला चालना देणे, नवीन उद्योग-व्यवसाय उभारण्यासाठी मार्गदर्शन करणे आणि स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मितीला प्रोत्साहन देणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे. या प्रशिक्षणामध्ये सहभागी उमेदवारांना उद्योग व व्यवसाय निवड, व्यवसाय नियोजन, बाजारपेठेचा अभ्यास (मार्केट रिसर्च), विविध शासकीय योजना व जिल्हा उद्योग केंद्राची माहिती, डिजिटल मार्केटिंग व कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित साधनांचा वापर, अकाउंट्स व करप्रणाली (Taxation), उद्योजकीय मानसिकता विकसित करणे, बँक कर्ज प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन, विक्री कौशल्य (Sales Skills), ब्रँडिंग, नेटवर्किंग तसेच यशस्वी उद्योजकांचे अनुभव आणि बाजारपेठेतील संधी याविषयी सविस्तर प्रशिक्षण दिले जाणार आहे. अमृत जिल्हा कार्यालय, कोल्हापूर येथे २० जुलै ते २३ जुलै रोजी हे प्रशिक्षण होणार आहे. अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी इच्छुकांनी अमृत कार्यालय, कोल्हापूर येथे संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

अमृत जिल्हा कार्यालय संपर्क क्रमांक :- 9112228764

जिल्हा कार्यालय पत्ता : अमृत जिल्हा कार्यालय ,नागाळा पार्क,कोल्हापूर . अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी,जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार इत्यादी जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व 36 जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/


Publisher: Abhijeet Kulkarni News publisher name | Date: 15-07-2026 News publication date | Time: 10:28 AM News publication time | Views: 54 Number of times this news has been viewed | District: Kolhapur Related district of the news
Publisher: Abhijeet Kulkarni News publisher name | Date: 15-07-2026 News publication date | Time: 10:28 AM News publication time | Views: 54 Number of times this news has been viewed | District: Kolhapur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement