अहिल्यानगर मध्ये अमृत संस्थे च्या वतीने "अमृत उद्योजकता विकास कार्यक्रम"(EDP)प्रशिक्षण चे आयोजन करण्यात आले आहे.
अहिल्यानगर मध्ये "अमृत उद्योजकता विकास कार्यक्रम"(EDP)प्रशिक्षण चे आयोजन. अमृत संस्थे च्या वतीने खुल्या प्रवर्गातील अमृतच्या लक्षित गटातील उमेदवारांना व्यवसाय समृद्ध करण्यासाठी व रोजगार निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे दृष्टीने स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.यामध्ये पुढील बाबतीत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
- व्यवसाय कसा निवडावा - व्यवसाय नियोजन व मार्केट रिसर्च - जिल्हा उद्योग केंद्र व विविध शासकीय योजना - डिजिटल मार्केटिंग व AI टूल्स - अकाउंट आणि टॅक्सशन - उद्योजकीय मानसिकता (आत्मविश्वास,संघटन कौशल्य, रिस्क टेकिंग,उपक्रमशीलता) - बँक अधिकारी, सी ए मार्गदर्शन (लोन प्रक्रिया,कागद प्रक्रिया ) - सेल्स स्किल, ब्रॅण्डिंग,मार्केटिंग, नेटवर्किंग. - मार्केट सर्व्हे, यशस्वी व्यवसायिक मार्गदर्शन - अमृत पेठ -बाजार पेठ व ऑनलाईन प्लॅटफॉर्म माहिती अहिल्यानगर अमृत कार्यालय येथे दिनांक १५ जुलै रोजी दुपारी १२ वाजता अमृत उद्योजकता विकास प्रशिक्षण बॅच चालू होणार आहे.
एकूण १० दिवसाचे प्रशिक्षण असणार आहे. ( ४ दिवस अमृत कार्यालय येथे ऑफलाईन ( रोज दोन तास ) व ६ दिवस ऑनलाईन )
प्रशिक्षण पुर्ण झाल्यावर लाभार्थी यांना शासकीय प्रमाणपत्र दिले जाईल.जे अनेक ठिकाणी प्रभावी पणे उपयोगी पडेल.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी,जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार इत्यादी जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व 36 जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/ अमृत जिल्हा कार्यालय संपर्क क्रमांक :- 9112228769 जिल्हा कार्यालय पत्ता : वरुण अपार्टमेंट, आकाशवाणी केंद्र समोर,प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर - 414003
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment