अथर्वशीर्ष व श्रीसूक्त पठण कार्यक्रमात ‘अमृत’च्या योजनांची दिली माहिती

अथर्वशीर्ष व श्रीसूक्त पठण कार्यक्रम भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला. यावेळी उपस्थित भाविकांना अमृतच्या विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.

अथर्वशीर्ष व श्रीसूक्त पठण कार्यक्रमात ‘अमृत’च्या योजनांची दिली माहिती मुख्य फोटो
मुख्य फोटो

धाराशिव :कार्यक्रमाची सुरुवात गणेशपूजन व सामूहिक अथर्वशीर्ष पठणाने झाली. त्यानंतर श्रीसूक्ताचे सामूहिक पठण करण्यात आले. या प्रसंगी उपस्थितांना अमृतच्या विविध उपक्रमांची, समाजोपयोगी योजनांची तसेच संस्कार, सेवा आणि सामाजिक जनजागृतीसाठी राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती देण्यात आली. अमृत सखी सौ. कल्याणी सराफ यांनी अमृतच्या माध्यमातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले. उपस्थितांनी योजनांविषयी उत्सुकता दाखवत विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची तयारी दर्शविली. कार्यक्रमाला भाविकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. शेवटी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/


Publisher: कल्याणी सराफ News publisher name | Date: 11-07-2026 News publication date | Time: 06:18 PM News publication time | Views: 65 Number of times this news has been viewed | District: Dharashiv Related district of the news
Publisher: कल्याणी सराफ News publisher name | Date: 11-07-2026 News publication date | Time: 06:18 PM News publication time | Views: 65 Number of times this news has been viewed | District: Dharashiv Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement