अमरावती, अमृत संस्थेमार्फत दि. 16 जुलै 2026 पासून पुणे येथे ‘मानसमित्र’ प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
मानसिक आरोग्य जागरूकता, समुपदेशन कौशल्ये व व्यक्तिमत्त्व विकास यासाठी हे प्रशिक्षण राबविण्यात येणार असून अमरावती जिल्ह्यातील अमृत लक्षित गटातील पात्र लाभार्थ्यांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी तातडीने अर्ज करावा असे आवाहन अमृत अमरावती जिल्हा कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
या प्रशिक्षणासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, वार्षिक उत्पन्न ₹8 लाखांपर्यंत असल्याचा उत्पन्नाचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला (टीसी)/शैक्षणिक पुरावा, दोन पासपोर्ट आकाराचे फोटो, स्वघोषणापत्र, स्वाक्षरी, मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी (असल्यास)ही कागदपत्रे आवश्यक आहेत. 'अमृत' लक्षित गटामध्ये सिंधी, मारवाडी, राजपुरोहित, ब्राह्मण, काम्मा, कायस्थ, अय्यंगार, नागर, नायडू, पाटीदार, बंगाली, पटेल, वेलमार, त्यागी, सेनगुंठर, भूमिहार, गुजराती, जाट, बनिया, राजपूत, कोमटी, नेपाळी हिंदू व लोहाना या समाजांचा समावेश असून, या लक्षित गटातील पात्र उमेदवारांसाठी हे प्रशिक्षण पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी
[https://app.mahaamrut.org.in/amrut-new/scheme/336](https://app.mahaamrut.org.in/amrut-new/scheme/336)
या लिंकवर ऑनलाईन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी
अमृत अमरावती जिल्हा कार्यालय, आशीर्वाद बिल्डिंग, मालटेकडी रोड, गृह निर्माण भवन जवळ, टोपे नगर, मालटेकडी, अमरावती – 444602येथे संपर्क साधावा
किंवा 9112227635या क्रमांकावर संपर्क साधावा,
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment