ठाणे येथे ब्राह्मण ब्रिज नेटवर्क असोसिएशनचा उद्योजक संवाद

ब्राह्मण समाजातील उद्योजक, व्यावसायिक, स्टार्टअप संस्थापक आणि स्वयंरोजगार करणाऱ्यांना एकाच व्यासपीठावर आणून परस्पर व्यवसाय वृद्धीला चालना देण्याच्या उद्देशाने ब्राह्मण ब्रिज नेटवर्क असोसिएशन, ठाणे यांच्या वतीने विशेष बिझनेस नेटवर्किंग मीटचे आयोजन करण्यात आले होते .

 ठाणे येथे  ब्राह्मण ब्रिज नेटवर्क असोसिएशनचा उद्योजक संवाद मुख्य फोटो
 ठाणे येथे  ब्राह्मण ब्रिज नेटवर्क असोसिएशनचा उद्योजक संवाद अतिरिक्त फोटो

ब्राह्मण समाजातील उद्योजक, व्यावसायिक, स्टार्टअप संस्थापक आणि स्वयंरोजगार करणाऱ्यांना एकाच व्यासपीठावर आणून परस्पर व्यवसाय वृद्धीला चालना देण्याच्या उद्देशाने ब्राह्मण ब्रिज नेटवर्क असोसिएशन, ठाणे यांच्या वतीने KIMS हॉस्पिटल, हिरानंदानी इस्टेट, ठाणे येथे विशेष बिझनेस नेटवर्किंग मीटचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला लघुउद्योजक, स्वयंरोजगार करणारे सर्व सभासद उपस्थित होते. आजच्या काळात ठाणे, मुंबई शहरांमध्ये व्यवसायासाठी स्वतंत्र कार्यालय किंवा दुकान उभारणे अत्यंत खर्चिक झाले असून, अशा परिस्थितीत एकमेकांच्या व्यवसायाला प्राधान्य देत आर्थिक सहकार्याचे मजबूत जाळे निर्माण करण्याची गरज असल्याचे BBNA चे जितेंद्रजी बजाज यांनी सांगितले. आपल्या समाजातील कोणता उद्योजक कोणता व्यवसाय करतो, हे जाणून त्याच्याकडून वस्तू व सेवा घेऊया हा या उपक्रमाचा मुख्य संदेश होता. अमृतच्या प्रेझेंटेशन मध्ये व्यावसायिकांना व्याज परतावा योजना तसेच ईडीपी ट्रेनिंग आणि अमृतपेठ ऑनलाइन/ ऑफलाइन आणि इतर योजना याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. उपस्थित लघु उद्योजकांचे नंबर घेऊन त्यांना ग्रुप मध्ये ऍड करण्यात आले. लवकरच ईडीपी प्रशिक्षण आणि इतर योजनांसाठीची आवश्यक कागदपत्रे ते तयार करणार आहेत. तसेच ड्रोन प्रशिक्षण आणि इतर शैक्षणिक योजनांसाठी तरुणांचा एक वेगळा ग्रुप करून लवकरच अमृत तर्फे मार्गदर्शन होणार आहे. कार्यक्रमाला BBNA,ठाणे चे पदाधिकारी उपस्थित होते.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: माया रत्नपारखी -खेत्रे News publisher name | Date: 29-06-2026 News publication date | Time: 02:51 PM News publication time | Views: 67 Number of times this news has been viewed | District: Thane Related district of the news
Publisher: माया रत्नपारखी -खेत्रे News publisher name | Date: 29-06-2026 News publication date | Time: 02:51 PM News publication time | Views: 67 Number of times this news has been viewed | District: Thane Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement