आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथील रायझिंग स्टार किड्समध्ये अमृत योग वर्गाचे आयोजन करण्यात आले होते
दि. २० जून २०२६
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर येथील रायझिंग स्टार किड्स विद्यालयात अमृत योग वर्गाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थी,शिक्षक उत्साहाने सहभाग घेतला.
कार्यक्रमात अमृत सखी मंजू कुलकर्णी यांनी योगाचे शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक महत्त्व पटवून दिले. त्यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासने, सूक्ष्म व्यायाम, प्राणायाम तसेच श्वसनाच्या योग्य पद्धतींचे प्रात्यक्षिक करून दाखविले. योगामुळे शरीर निरोगी राहते, मन शांत होते व एकाग्रता वाढते, असे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी योगासनांचा सराव करत योग दिनाचा संदेश आत्मसात केला. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये योगाबाबत जागरूकता निर्माण झाली असून निरोगी जीवनशैलीचा संकल्प करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल विद्यालय प्रशासनाने अमृत सखी मंजू कुलकर्णी यांचे आभार मानले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना शासकीय संस्था, आयोग किंवा महामंडळ यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment