अमृतच्या ड्रोन प्रशिक्षणातून युवकाला मिळाली उद्योजकतेची नवी दिशा

छत्रपती संभाजीनगर येथील गौरव शामसुंदरजी शर्मा यांनी शेती विषयक ड्रोन पायलट प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करून लवकरच स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला.

अमृतच्या ड्रोन प्रशिक्षणातून युवकाला मिळाली उद्योजकतेची नवी दिशा मुख्य फोटो
अमृतच्या ड्रोन प्रशिक्षणातून युवकाला मिळाली उद्योजकतेची नवी दिशा अतिरिक्त फोटो

छ. संभाजी नगर (3 जून) - अमृतच्या ड्रोन पायलट प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक युवक युवतींना नवे आकाश मोकळे झाले आहे. राज्यातील विविध भागातील शेकडो लाभार्थ्यांना आजवर या योजनेचा लाभ घेऊन त्यांचे स्वप्न साकार केले आहे. नुकत्याच छ. संभाजी नगर जिल्ह्यातून ड्रोन प्रशिक्षण पूर्ण करून आलेल्या गौरव शामसुंदरजी शर्मा यांच्याशी विभाग व्यवस्थापक अमित सामंत यांनी संवाद साधला याप्रसंगी श्री गौरव शर्मा यांनी ड्रोन पायलट प्रशिक्षण कार्यक्रमाची प्रशंसा केली. यातून मिळालेल्या लाभाबद्दल आभार व्यक्त केले. शेती या विषयात ड्रोन पायलट प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर लवकरच आपण स्वतःचा व्यवसाय सुरू करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.त्यांनी जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे यांचे आणि छत्रपती संभाजीनगर अमृत कार्यालय सर्व संबंधितांचे आभार मानले आणि जास्तीत जास्त तरुणांनी अमृतच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील केले. अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 04-06-2026 News publication date | Time: 01:17 PM News publication time | Views: 21 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news
Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 04-06-2026 News publication date | Time: 01:17 PM News publication time | Views: 21 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement