अंधानेर येथील जाट समाजाच्या बैठकीत अमृत संस्थेच्या योजनांच्या माहितीचा प्रसार

सेंद्रिय शेती व ड्रोन प्रशिक्षणाबाबतही मार्गदर्शन

अंधानेर येथील जाट समाजाच्या बैठकीत अमृत संस्थेच्या योजनांच्या माहितीचा प्रसार मुख्य फोटो
अंधानेर येथील जाट समाजाच्या बैठकीत अमृत संस्थेच्या योजनांच्या माहितीचा प्रसार अतिरिक्त फोटो

कन्नड (छत्रपती संभाजीनगर) : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे कन्नड तालुक्यातील अंधानेर येथे जाट समाजबांधवांची बैठक घेण्यात आली. ही बैठक समाजाचे तालुकाध्यक्ष जयसिंग जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. बैठकीला समाजातील ३५ बांधव उपस्थित होते. या वेळी अमृत संस्थेचे जिल्हा उपव्यवस्थापक योगेश रोडे यांनी अमृत संस्थेच्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे, असे आवाहन केले.

रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता कमी होत असून खर्चही वाढत आहे. त्यामुळे सेंद्रिय शेतीचे फायदे त्यांनी उपस्थितांना समजावून सांगितले. लवकरच १५ तरुण शेतकऱ्यांकरिता सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन शिबिर घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीत ड्रोन प्रशिक्षणाबाबतही माहिती देण्यात आली. पवनसिंग तोडावत व गणेश जाखड या दोन युवकांना ड्रोन प्रशिक्षणासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती देण्यात आली. त्यांनी हे प्रशिक्षण घेण्याची तयारी दर्शवली असून, लवकरच अर्ज करणार असल्याचे सांगितले. या बैठकीमुळे जाट समाजातील बांधवांना शासनाच्या योजनांची माहिती मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/


Publisher: योगेश रोडे News publisher name | Date: 29-05-2026 News publication date | Time: 11:56 PM News publication time | Views: 299 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news
Publisher: योगेश रोडे News publisher name | Date: 29-05-2026 News publication date | Time: 11:56 PM News publication time | Views: 299 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement