अमृत संस्थेच्या योजनांचा जळकोटमध्ये जागर

कोमटी समाजाने योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

अमृत संस्थेच्या योजनांचा जळकोटमध्ये जागर मुख्य फोटो
अमृत संस्थेच्या योजनांचा जळकोटमध्ये जागर अतिरिक्त फोटो

लातूर : कोमटी समाजातर्फे जळकोट (जि. लातूर) येथील दत्त मंदिरात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीमध्ये अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक शुभम मुळजकर यांनी मार्गदर्शन केले. अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या लक्ष्यित घटकांमध्ये कोमटी समाजाचा समावेश होतो. त्यामुळे या समाजाने अमृत संस्थेच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन मुळजकर यांनी या वेळी केले. या वेळी अमृतमित्र प्रशांत कापसे, जळकोट येथील कोमटी समाज संघटनेचे सचिव श्रीकृष्ण कोटलवार, सामाजिक कार्यकर्ते सतीश कोंडेवार आणि अमृत संस्थेतर्फे ड्रोन प्रशिक्षण घेतलेले सुदेश रायवार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/


Publisher: Shubham Mulajkar News publisher name | Date: 29-05-2026 News publication date | Time: 11:16 AM News publication time | Views: 1,187 Number of times this news has been viewed | District: Latur Related district of the news
Publisher: Shubham Mulajkar News publisher name | Date: 29-05-2026 News publication date | Time: 11:16 AM News publication time | Views: 1,187 Number of times this news has been viewed | District: Latur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement