सावरकर जयंतीदिनी निल्लोडमध्ये विद्यार्थ्यांनी घेतली अमृत युवा प्रेरणा शपथ

अमृत आणि माऊली वारकरी शिक्षण संस्था तथा अनाथालय या संस्थांतर्फे आयोजन

सावरकर जयंतीदिनी निल्लोडमध्ये विद्यार्थ्यांनी घेतली अमृत युवा प्रेरणा शपथ मुख्य फोटो
सावरकर जयंतीदिनी निल्लोडमध्ये विद्यार्थ्यांनी घेतली अमृत युवा प्रेरणा शपथ अतिरिक्त फोटो

सिल्लोड (छत्रपती संभाजीनगर) : अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था आणि निल्लोड येथील माऊली वारकरी शिक्षण संस्था तथा अनाथालय या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीदिनी अमृत युवा प्रेरणा शपथ घेण्याचा प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात पार पडला. माऊली वारकरी शिक्षण संस्था तथा अनाथालयाचे संस्थापक अध्यक्ष रामेश्वरमहाराज पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या कार्यक्रमाचे नियोजन अमृत संस्थेचे जिल्हा उपव्यवस्थापक योगेश रोडे यांनी केले. या वेळी संस्थेचे मुख्याध्यापक कृष्णा जैवळ, व्यवस्थापक दिगावकर, तसेच संस्थेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक कृष्णा जैवळ यांनी केले. अमृत संस्थेचे जिल्हा उपव्यवस्थापक योगेश रोडे यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे राष्ट्रप्रेम, त्याग, संघर्ष आणि विचारांची माहिती दिली. तसेच अमृत संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात येणारे अमृतवर्ग व अमृत मेळावा या उपक्रमांची माहितीही विद्यार्थ्यांना देण्यात आली.

या वेळी विद्यार्थ्यांना अमृत युवा प्रेरणा शपथ देण्यात आली. शपथ घेताना विद्यार्थ्यांनी देशप्रेम, शिस्त, कर्तव्यनिष्ठा, सामाजिक बांधिलकी, अंधश्रद्धा निर्मूलन, शिक्षण, स्वावलंबन आणि विज्ञाननिष्ठ विचारांचा स्वीकार करण्याचा संकल्प केला. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, सामाजिक जाणीव आणि सकारात्मक विचारांची प्रेरणा निर्माण झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. निल्लोड येथे झालेला हा उपक्रम युवकांसाठी प्रेरणादायी ठरला.

विद्यार्थ्यांनी घेतलेली अमृत युवा प्रेरणा शपथ

मी, आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त शपथ घेतो, की मी माझ्या देशाच्या प्रगतीसाठी सदैव प्रामाणिकपणे कार्य करीन. राष्ट्रप्रेम, शिस्त, कर्तव्यनिष्ठा आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांचे पालन करीन. समाजातील अंधश्रद्धा, अन्याय आणि वाईट प्रथांविरुद्ध जागरुक राहीन. शिक्षण, स्वावलंबन आणि विज्ञाननिष्ठ विचारांचा स्वीकार करून इतरांनाही प्रेरित करीन. देशाची एकता, अखंडता आणि संविधानाचा सन्मान राखण्यासाठी कटिबद्ध राहीन. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन आदर्श नागरिक बनण्याचा प्रयत्न करीन. भारत माता की जय! वंदे मातरम्!

.....

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/


Publisher: योगेश रोडे News publisher name | Date: 28-05-2026 News publication date | Time: 11:39 PM News publication time | Views: 170 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news
Publisher: योगेश रोडे News publisher name | Date: 28-05-2026 News publication date | Time: 11:39 PM News publication time | Views: 170 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement