यशस्वीपणे राबवण्यात आला उपक्रम
नांदेड : अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था ब्राह्मणांसह खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. कौशल्य प्रशिक्षण, व्याजपरतावा यांसह या संस्थेच्या विविध योजना आहेत. त्या योजनांचा प्रसार करण्यासाठी नांदेडमध्ये बीबीएन (ब्राह्मण बिझनेस नेटवर्क) संघटनेचे साह्य मिळाले. विविध शासकीय व सामाजिक योजनांची सविस्तर माहिती बीबीएन संघटनेच्या टीमपर्यंत पोहोचवण्यात आली. त्या माध्यमातून ही माहिती जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. अमृत संस्थेतर्फे परिवार सर्वेक्षणही सध्या सुरू आहे.
या कार्यक्रमासाठी अमृत संस्थेचे मराठवाडा विभागीय व्यवस्थापक ओमकार शेटे यांचे मार्गदर्शन लाभले. या उपक्रमात अमृतसखी मनीषा कुनसावळीकर, अमृतसखी संजना कुलकर्णी, अमृतमित्र विश्वास बदापूरकर यांचा सक्रिय सहभाग होता. सर्वांच्या संयुक्त प्रयत्नातून हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला असून, समाजातील प्रत्येक घटकापर्यंत योजनांची माहिती पोहोचवण्याचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे, असे संस्थेतर्फे सांगण्यात आले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment