जिल्हा संघचालक कांकरिया यांच्या हस्ते मालेगावमधील पहिल्या अमृतपेठ थेट बाजारपेठेचे उद्घाटन - अमृत महाराष्ट्र

जिल्हा संघचालक कांकरिया यांच्या हस्ते मालेगावमधील पहिल्या अमृतपेठ थेट बाजारपेठेचे उद्घाटन

३० उद्योजकांनी घेतला सहभाग; १४ एप्रिलपर्यंत सुरू राहणार खरेदीचा उत्सव

जिल्हा संघचालक कांकरिया यांच्या हस्ते मालेगावमधील पहिल्या अमृतपेठ थेट बाजारपेठेचे उद्घाटन मुख्य फोटो
जिल्हा संघचालक कांकरिया यांच्या हस्ते मालेगावमधील पहिल्या अमृतपेठ थेट बाजारपेठेचे उद्घाटन अतिरिक्त फोटो

मालेगाव : अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या अमृतपेठ थेट बाजारपेठ हा राज्यभरात यशस्वी ठरलेला महत्त्वाकांक्षी उपक्रम मालेगावात प्रथमच आयोजित करण्यात आला असून, मान्यवरांच्या हस्ते आज (१३ एप्रिल) त्याचे उद्घाटन झाले. मालेगावमधील बालगंधर्व मंगल कार्यालयात ही बाजारपेठ भरली असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक अशोक कांकरिया यांच्या हस्ते उद्घाटन कार्यक्रम पार पडला. कांकरिया यांनी अमृत संस्थेचे व विविध भागांतून आलेल्या उद्योजकांचे कौतुक केले. या उपक्रमात विविध प्रकारच्या ३० उत्पादकांनी नोंदणी करून स्टॉल लावले आहेत. मालेगावकरांनी येथे भेट देऊन जास्तीत जास्त खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले. 

उद्घाटन कार्यक्रमात अमृत संस्थेचे नाशिक विभागीय व्यवस्थापक मंगेश खाडिलकर यांनी उपस्थितांना अमृत संस्थेच्या योजनांविषयी मार्गदर्शन केले. शहर संघचालक नितीन मुनोत, मालेगाव ब्राह्मण सहायक संघाचे नंदकुमार पाठक, नितीन पोफळे, हरिप्रसाद गुप्ता, आई बाणाई सामाजिक संस्थेच्या संचालिका मंजूषा कजवाडकर, अनिता सोनवणे, विजयालक्ष्मी अहिरे, विकी शर्मा, विद्याताई पेठकर, कल्पेश हेडा, मधुबाबा अग्रवाल, कविता कासलीवाल, शिवसेना नेते प्रमोद शुक्ला यांच्यासह अनेक मान्यवर उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित होते.

अमृतपेठ थेट बाजारपेठ - मालेगाव 

दिनांक : १३ व १४ एप्रिल २०२६

वेळ : सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत

स्थळ : बालगंधर्व मंगल कार्यालय, सोमवार बाजार, मालेगाव कॅम्प, मालेगाव. 

अधिक माहितीसाठी संपर्क : 

दीपक गुप्ता : 9423476929

संजय गोसावी : 8857073911

अजिंक्य कन्नल : 9665692676

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 13-04-2026 News publication date | Time: 05:38 PM News publication time | Views: 632 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 13-04-2026 News publication date | Time: 05:38 PM News publication time | Views: 632 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement