नगर शहर तहसीलदार स्वप्नील ढवळे यांच्या हस्ते झाला प्रारंभ
अहिल्यानगर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे अहिल्यानगर जिल्ह्यात आठ एप्रिलपासून अमृत परिवार सर्वेक्षणाचा प्रारंभ झाला. त्याअंतर्गत अमृत संस्थेच्या योजनांची माहिती देणारे स्टिकर लावण्यास नगर शहर तहसील कार्यालयातून सुरुवात करण्यात आली. तहसीलदार स्वप्नील ढवळे यांच्या हस्ते त्याचा प्रारंभ झाला. त्या वेळी अमृत संस्थेचे अहिल्यानगर जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालये, तहसील कार्यालये आणि इतर शासकीय कार्यालयांमध्ये अमृत संस्थेच्या योजनांचे स्टिकर लावण्यात येणार आहेत. या माध्यमातून लक्ष्यित गटापर्यंत योजनांची माहिती अधिक जलदपणे पोहोचेल आणि त्यांना अमृत कार्यालयात संपर्क साधण्यास मदत होईल.
अधिक माहितीसाठी संपर्क : 9112228769
जिल्हा कार्यालय : वरुण अपार्टमेंट, आकाशवाणीसमोर,
प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर - 414003
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment