कडेगावमध्ये अमृत मेळाव्याला चांगला प्रतिसाद

प्रशिक्षण योजनांचा लाभ घेऊन व्यवसाय सुरू करण्याचे सांगली जिल्हा व्यवस्थापकांचे आवाहन

फोटो उपलब्ध नाहीत

या बातमीशी संबंधित कोणतेही फोटो उपलब्ध नाहीत

कडेगाव : सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथील श्रीराम मंदिरात १३ डिसेंबर रोजी अमृत मेळावा आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी म्हणजेच अमृत ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील जातींसाठी काम करते. त्या संस्थेच्या योजनांची माहिती देणाऱ्या मेळाव्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

ब्राह्मण सभेचे पदाधिकारी दीपक कुलकर्णी यांनी अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक शैलेंद्र जहागीरदार यांचे स्वागत केले. अमृतमित्र अभिजित कुलकर्णी यांचे स्वागत श्री. इनामदार यांनी केले. प्रास्ताविकात दीपक कुलकर्णी यांनी ब्राह्मण समाजातील कुटुंबांची आजची परिस्थिती व गरज याबद्दल भाष्य करून समाजाला अमृत संस्थेच्या योजनांची खरी गरज असल्याचे मत व्यक्त केले. शैलेंद्र जहागीरदार यांनी अमृत संस्थेच्या विविध प्रशिक्षण कार्यक्रमांची, तसेच विद्यार्थ्यांसाठीच्या शैक्षणिक योजना, व्यावसायिकांसाठी व्याजपरतावा योजना, युवकांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम व इतर सर्व योजनांबद्दल माहिती दिली. प्रशिक्षण योजनांचा लाभ घेऊन व्यवसाय सुरू करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच उपस्थितांच्या मनातील शंका व प्रश्नांचे निरसन केले. अभिजित कुलकर्णी यांनी आवश्यक कागदपत्रांबद्दल माहिती दिली.

अमृत संस्थेच्या योजनांची सविस्तर माहिती सांगितल्याबद्दल श्री. इनामदार यांनी अमृत जिल्हा व्यवस्थापक शैलेंद्र जहागीरदार व अभिजित कुलकर्णी यांचे आभार मानले. तसेच होतकरूंनी या संस्थेच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ करून घ्यावा, असे आवाहन केले.

अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/

Publisher: Shailendra Jahagirdar News publisher name | Date: 20-12-2025 News publication date | Time: 12:00 AM News publication time | Views: 63 Number of times this news has been viewed | District: sangli Related district of the news
Publisher: Shailendra Jahagirdar News publisher name | Date: 20-12-2025 News publication date | Time: 12:00 AM News publication time | Views: 63 Number of times this news has been viewed | District: sangli Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words