अमृत संस्थेच्या योजनांची माहिती देण्यासाठी पालघरमध्ये बैठक - अमृत महाराष्ट्र

अमृत संस्थेच्या योजनांची माहिती देण्यासाठी पालघरमध्ये बैठक

लायन्स क्लब आणि रोटरी क्लबच्या माध्यमातून मिळणार योजनाप्रसारासाठी सहकार्य

अमृत संस्थेच्या योजनांची माहिती देण्यासाठी पालघरमध्ये बैठक मुख्य फोटो
अमृत संस्थेच्या योजनांची माहिती देण्यासाठी पालघरमध्ये बैठक अतिरिक्त फोटो

पालघर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. या संस्थेच्या कार्याची आणि योजनांची माहिती देण्यासाठी पालघरच्या अमृतसखी कोमल जोशी यांनी लायन्स क्लब आणि रोटरी क्लबच्या सहकार्याने संस्थेच्या लक्ष्यित गटातील नागरिकांशी संपर्क साधला. त्यांनी अमृत संस्थेच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत ही माहिती पोहचवण्याची ग्वाही दिली. अमृत वर्ग घेण्यासाठी जागा, तसेच निवासी अमृत वर्गासाठीही सहकार्य करण्याची तयारी त्यांनी दर्शवली.

या वेळी लायन्स क्लब ऑफ वसईचे अध्यक्ष डॉ. अनिरुद्ध चव्हाण, माजी प्रांतपाल डॉ. प्रशांत पाटील, ओंकार पाटील, सौ. चारू पाटील, तसेच, शिवभवानी मंदिर ट्रस्टचे प्रवीण पाटील, राजेश पाटकर, मनोज भेंकट, मीनल भेंकट, विशाल कांबळे, नीलम कांबळे उपस्थित होते.

डॉ. अनिरुद्ध चव्हाण यांनी सांगितले, 'अमृत संस्था मोठे काम करत असून, लक्ष्यित गटातील नागरिकांसाठी अलीकडेपर्यंत योजना नव्हत्या. त्यामुळे अमृत संस्थेचे कार्य चांगले असून, या योजनांची माहिती आमच्या वतीने जास्त जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू.'

विशाल कांबळे आणि नीलम कांबळे यांनी सांगितले, की 'अमृत संस्थेच्या अनेक योजनांची माहिती मिळाली. लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त जणांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी आम्ही सहकार्य करू.'

अधिक माहितीसाठी संपर्क :

कोमल जोशी - 90493 54123

अमृतसखी, पालघर

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/



Publisher: Komal Joshi News publisher name | Date: 12-04-2026 News publication date | Time: 08:36 PM News publication time | Views: 263 Number of times this news has been viewed | District: Palghar Related district of the news
Publisher: Komal Joshi News publisher name | Date: 12-04-2026 News publication date | Time: 08:36 PM News publication time | Views: 263 Number of times this news has been viewed | District: Palghar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement