प्रहार समाज जागृती संस्थेच्या रक्तदान शिबिरात अमृत संस्थेचा सहभाग

अमृत परिवार सर्वेक्षणाची देण्यात आली माहिती

प्रहार समाज जागृती संस्थेच्या रक्तदान शिबिरात अमृत संस्थेचा सहभाग मुख्य फोटो
मुख्य फोटो

नागपूर : प्रहार समाज जागृती संस्थेचे संस्थापक स्व. कर्नल सुनील देशपांडे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात अमृत संस्थेच्या नागपूर कार्यालयातील प्रतिनिधींनी सक्रिय सहभाग घेतला. रवींद्र श्रौती आणि निखील देशपांडे यांनी उपस्थितांना अमृत परिवार सर्वेक्षणाबद्दल सविस्तर माहिती दिली.

त्यांनी सांगितले, की अमृत परिवार सर्वेक्षण या उपक्रमाचा मुख्य उद्देश समाजातील विद्यार्थी, युवक, महिला, शेतकरी आणि उद्योजक यांना विविध शासकीय व अमृत संस्थेच्या योजनांचा लाभ मिळवून देणे हा आहे. या सर्वेक्षणामध्ये कुटुंबांची शैक्षणिक, आर्थिक व व्यावसायिक माहिती संकलित केली जाते. त्यामुळे योग्य योजना योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे सुलभ होते. तसेच युवकांना रोजगार, कौशल्य विकास आणि उद्योजकता यांसाठीचे मार्गदर्शनही या माध्यमातून केले जाते.

प्रहार समाज जागृती संस्थेच्या माध्यमातून अमृत संस्थेच्या योजनांची माहिती लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन या वेळी फ्लाइट लेफ्टनंट शिवाली देशपांडे यांनी दिले. या उपक्रमामुळे युवकांमध्ये सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रीय सेवाभाव वाढीस लागणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

प्रहार समाज जागृती संस्था युवकांसाठी प्रेरणास्थान ठरत असून, तेथे एनडीए, यूपीएससी, एमपीएससीसाठी आवश्यक प्रशिक्षण, तसेच प्रहार मिलिटरी स्कूलच्या माध्यमातून विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. 

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Harshal Gadre News publisher name | Date: 10-04-2026 News publication date | Time: 04:04 PM News publication time | Views: 262 Number of times this news has been viewed | District: Nagpur Related district of the news
Publisher: Harshal Gadre News publisher name | Date: 10-04-2026 News publication date | Time: 04:04 PM News publication time | Views: 262 Number of times this news has been viewed | District: Nagpur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement