लातूरमध्ये नारी प्रबोधन मंचातर्फे आयोजित बैठकीत अमृत संस्थेच्या योजनांचा जागर

योजना आणि प्रशिक्षण कार्यक्रमांची देण्यात आली माहिती

लातूरमध्ये नारी प्रबोधन मंचातर्फे आयोजित बैठकीत अमृत संस्थेच्या योजनांचा जागर मुख्य फोटो
लातूरमध्ये नारी प्रबोधन मंचातर्फे आयोजित बैठकीत अमृत संस्थेच्या योजनांचा जागर अतिरिक्त फोटो

लातूर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. ही संस्था उद्योजकतावाढीसाठी कसून प्रयत्न करते आणि त्या अनुषंगाने अनेक योजना व प्रशिक्षण कार्यक्रम राबवते. या योजना आणि प्रशिक्षण कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी नारी प्रबोधन मंचातर्फे बैठकीचे नियोजन करण्यात आले होते. या वेळी अमृत संस्थेचे लातूर जिल्हा व्यवस्थापक शुभम मुळजकर यांना आमंत्रित करण्यात आले होते. 

नारी प्रबोधन मंचातर्फे घेण्यात आलेल्या बैठकीत अध्यक्षा सुमती जगताप, कोषाध्यक्षा हेमलता वैद्य, सीनिअर अकाउंट ऑफिसर सतीश मिरखलकर, संस्था विधी सल्लागार ॲड. राधाकृष्ण देशमुख, उषा शिंदे ,ॲड. सलगरे, ॲड. अनंत बावणे, दिलीप देशमुख, संकेत देशमुख आणि इतर मान्यवर या वेळी उपस्थित होते. अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक शुभम मुळजकर यांनी या वेळी अमृत संस्थेच्या योजना, अमृतपेठ ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि अमृतपेठ थेट बाजारपेठेबद्दल माहिती दिली. उपस्थितांनी योजनांबद्दल कुतूहल व्यक्त केले. या वेळी अमृत संस्थेची दिनदर्शिका देण्यात आली. 

अधिक माहितीसाठी संपर्क : 

शुभम मुळजकर - ७३९१०६५४७० 

लातूर जिल्हा व्यवस्थापक, अमृत

कार्यालयाचा पत्ता :

अमृत संस्थेचे लातूर जिल्हा कार्यालय,

पहिला मजला, पितृछाया बिल्डिंग,

मयुरेश्वर अपार्टमेंट, सिग्नल कॅम्प,

विद्यानगर, लातूर - ४१३५१२

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: शुभम सुहासराव मुळजकर News publisher name | Date: 10-04-2026 News publication date | Time: 10:34 AM News publication time | Views: 820 Number of times this news has been viewed | District: Latur Related district of the news
Publisher: शुभम सुहासराव मुळजकर News publisher name | Date: 10-04-2026 News publication date | Time: 10:34 AM News publication time | Views: 820 Number of times this news has been viewed | District: Latur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement