परशुराम जन्मोत्सवानिमित्त अमृत आणि अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
यवतमाळ : परशुराम जन्मोत्सवाच्या निमित्ताने अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था आणि अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळमध्ये १७ आणि १८ एप्रिल रोजी अमृतपेठ थेट बाजारपेठ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तपशील बातमीच्या शेवटी दिला आहे.
या अमृतपेठेमध्ये स्थानिक शेतकरी, महिला बचत गट, तसेच लघुउद्योजक यांना त्यांच्या उत्पादनांची थेट विक्री करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. धान्य, घरगुती पदार्थ, तसेच विविध हस्तकला वस्तू येथे ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत. या उपक्रमामुळे लघु उद्योजकांना योग्य दर मिळण्यास मदत होईल, तसेच ग्राहकांना ताजी व दर्जेदार स्थानिक उत्पादने थेट उत्पादकांकडून मिळतील. स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देणे हा या अमृतपेठेचा मुख्य हेतू आहे. यवतमाळकर नागरिकांनी या उपक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
अमृतपेठ थेट बाजारपेठ - यवतमाळ
दिनांक : १७ आणि १८ एप्रिल २०२६
वेळ : सायंकाळी पाच ते रात्री १० वाजेपर्यंत
स्थळ : विवेकानंद शाळा, यवतमाळ
अधिक माहितीसाठी संपर्क :
परीक्षित कमलकिशोर शर्मा - ९११२२२७६३३, ८०८७२४८६७४
यवतमाळ जिल्हा व्यवस्थापक, अमृत
जिल्हा कार्यालय पत्ता :
स्वामी समर्थ विहार, पहिला माळा,
फ्लॅट क्रमांक ए-१,
अवधूतवाडी, तिवारी चौक,
यवतमाळ - ४४५ ००१
ई-मेल : amrut.yavatmal.dm@gmail.com
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment