धुळ्यात १० एप्रिलपासून अमृत परिवार सर्वेक्षण अभियान

अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील कुटुंबांच्या माहिती संकलनासाठी मोठी मोहीम

धुळ्यात १० एप्रिलपासून अमृत परिवार सर्वेक्षण अभियान मुख्य फोटो
मुख्य फोटो

धुळे : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी म्हणजे अमृत ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या योजना लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त कुटुंबापर्यंत पोहोचाव्यात यासाठी अमृत संस्थेकडून संपूर्ण महाराष्ट्रातील लक्ष्यित गटातील कुटुंबांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. धुळे जिल्ह्यात हे अमृत परिवार सर्वेक्षण अभियान १० एप्रिल ते २५ एप्रिल या कालावधीत राबवले जाणार आहे, अशी माहिती अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक हेमंत पाठक यांनी दिली. 

खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना इतर कुठल्याही संस्था किंवा महामंडळे यांचा लाभ मिळत नाही, त्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणजेच कौटुंबिक वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असलेल्या घटकांसाठी अमृत संस्था काम करते. अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटात ब्राह्मण, सिंधी, हिंदू मारवाडी, गुजराती, पटेल, राजपूत, राजपुरोहित, हिंदू नेपाळी, बनिया, कम्मा, कायस्थ, अय्यंगार, नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, भूमिहार, येलमार, ठाकूर, त्यागी, सेनगुनथर, जाट, कानबी, कोमटी/वैश्य अशा जातींचा समावेश आहे. विद्यार्थी, तरुण, महिला, व्यावसायिक, शेतकरी अशा विविध घटकांसाठी संस्थेच्या विविध योजना आहेत. या योजना लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त कुटुंबापर्यंत पोहोचाव्यात, यासाठी परिवार सर्वेक्षण केले जाणार आहे. 

या सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश म्हणजे पात्र कुटुंबांची अचूक नोंद करून त्यांना शासनाच्या विविध योजना, कौशल्य प्रशिक्षण व आर्थिक साह्याचा लाभ उपलब्ध करून देणे हा आहे. या जातींमधील विद्यार्थी, तरुण, महिला, व्यावसायिक, शेतकरी अशा विविध घटकांसाठी संस्थेच्या प्रशिक्षण, उद्योजकीय योजना व व्याज परतावा यांसह विविध योजना आहेत. या योजना लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त कुटुंबांपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी परिवार सर्वेक्षण केले जाणार असल्याची माहिती अमृत संस्थेचे नाशिक विभागीय व्यवस्थापक मंगेश खाडिलकर यांनी सांगितली. 

अधिक माहितीसाठी संपर्क :

धुळे जिल्हा कार्यालय - अमृत,

२६, महाराणा प्रताप कॉलनी, 

जुन्या चिरंतन हॉस्पिटलजवळ, देवपूर, धुळे

संपर्क : 9112228772 / 9822829555

Publisher: वैशाली कुलकर्णी News publisher name | Date: 07-04-2026 News publication date | Time: 11:48 AM News publication time | Views: 1,839 Number of times this news has been viewed | District: dhule Related district of the news
Publisher: वैशाली कुलकर्णी News publisher name | Date: 07-04-2026 News publication date | Time: 11:48 AM News publication time | Views: 1,839 Number of times this news has been viewed | District: dhule Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement