नागपुरातील २५० तलावांच्या विकासातून निर्माण होऊ शकतात पर्यटनाच्या संधी

अमृत पर्यटन उपक्रमासंदर्भात चर्चेवेळी डॉ. कृतीश बालपांडे यांनी केले प्रतिपादन

नागपुरातील २५० तलावांच्या विकासातून निर्माण होऊ शकतात पर्यटनाच्या संधी मुख्य फोटो
मुख्य फोटो

नागपूर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवले जातात. तसेच, अमृत पर्यटनसारखे विविध प्रकारचे अन्य उपक्रमही राबवले जातात. अमृत संस्थेच्या योजनांच्या प्रसारासाठी नागपूरमध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. अमृत संस्थेचे नागपूर जिल्हा व्यवस्थापक हर्षल गद्रे आणि जिल्हा उपव्यवस्थापक वृषाली सवनकर यांनी डॉ. कृतीश बालपांडे यांची भेट घेऊन त्यांना योजनांबाबत सविस्तर माहिती दिली.

संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती देताना विशेषतः अमृत पर्यटन या संकल्पनेवर सखोल चर्चा करण्यात आली. पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक विकास, रोजगार निर्मिती आणि सांस्कृतिक जतन या मुद्द्यांचा त्यात समावेश होता. डॉ. बालपांडे यांनी नागपूरच्या पर्यटन क्षमतेबाबत महत्त्वपूर्ण माहिती देताना सांगितले, की जिल्ह्यात सुमारे २५० तलाव असून त्यांच्या योग्य विकासातून मोठ्या प्रमाणात पर्यटन संधी निर्माण होऊ शकतात.

डॉ. कृतीश बालपांडे यांना पर्यटनस्थळांना भेट देणे, तसेच नवीन पर्यटनस्थळांचा शोध घेण्याचा छंद आहे. त्यांच्या या अनुभवाचा आणि अभ्यासाचा उपयोग नागपूरच्या पर्यटन विकासासाठी होऊ शकतो, असे मत अमृत संस्थेकडून व्यक्त करण्यात आले. भविष्यात नागपूरला पर्यटनदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी विविध उपक्रम राबवण्याबाबत या बैठकीत सकारात्मक विचारमंथन झाले. अमृत पर्यटन उपक्रमाच्या माध्यमातून नागपूरला एक नवीन ओळख मिळवून देण्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Harshal Gadre News publisher name | Date: 06-04-2026 News publication date | Time: 01:57 PM News publication time | Views: 261 Number of times this news has been viewed | District: nagpur Related district of the news
Publisher: Harshal Gadre News publisher name | Date: 06-04-2026 News publication date | Time: 01:57 PM News publication time | Views: 261 Number of times this news has been viewed | District: nagpur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement