ब्राह्मण संघटनांच्या सहकार्याने आयोजन; खुल्या प्रवर्गासाठी असलेल्या योजनांची मिळणार माहिती
अहिल्यानगर : खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था विविध प्रकारच्या योजना राबवते. या संस्थेच्या सर्व योजनांची माहिती कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मण समाजाला देण्यासाठी चार एप्रिल रोजी कोपरगावमध्ये अमृत संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे. अमृत संस्था, कोपरगाव ब्राह्मण सभा आणि कोपरगाव बॉंड संघटन यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
अमृत संस्थेचे अहिल्यानगर जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे या वेळी संस्थेच्या सर्व योजनांची सविस्तर माहिती देणार आहेत. त्यामध्ये व्याजपरतावा योजनेसह उद्योजकतावाढीसाठी विविध प्रकारच्या निःशुल्क प्रशिक्षण कार्यक्रमांचाही समावेश आहे. विद्यार्थ्यांसाठीही अनेक योजना संस्थेतर्फे राबवल्या जातात. स्थानिक लघुउद्योजकांसाठी अमृतपेठ उपक्रम राबवला जातो. अशा सर्व उपयुक्त योजनांची माहिती घेण्यासाठी कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मण समाजासह संस्थेच्या लक्ष्यित गटातील सर्व समाजबांधव, विद्यार्थी आणि व्यावसायिकांनी या मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन संदीप देशपांडे यांनी केले आहे.
अमृत संवाद मेळावा
दिवस आणि वेळ : चार एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी साडेचार वाजता
स्थळ : सायबर सिस्टीम हॉल, पहिला मजला,
जानकी प्लाझा, स्वस्तिक मेडिकलशेजारी,
कोपरगाव, अहिल्यानगर
अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक : 9112228769
पत्ता : अमृत कार्यालय, आकाशवाणी केंद्रासमोर,
प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर - ४१४००३
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment