कोल्हापुरातील गांधीनगरमध्ये सुरू झाला अमृत संस्थेचा निःशुल्क ग्लॅमर प्रशिक्षण वर्ग

दर्जेदार आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षणाची संधी

कोल्हापुरातील गांधीनगरमध्ये सुरू झाला अमृत संस्थेचा निःशुल्क ग्लॅमर प्रशिक्षण वर्ग  मुख्य फोटो
मुख्य फोटो

कोल्हापूर : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचा ग्लॅमर प्रशिक्षण वर्ग एक एप्रिलपासून कोल्हापुरातील गांधीनगर येथे सुरू झाला आहे. १५ एप्रिलपर्यंत चालणार असलेला हा वर्ग 'आयजी कॉम्प्युटर्स'चे राजन डांगरे यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे. या निःशुल्क वर्गात ब्युटी पार्लर व्यवसायाचे प्रशिक्षण नामांकित संस्थेकडून दिले जाणार आहे. गांधीनगर शहरातील महिलांना उद्योगविश्वाकडे वाटचाल करण्याच्या दृष्टीने ही सुवर्णसंधी असल्याचे प्रतिपादन अमृत संस्थेचे कोल्हापूर जिल्हा व्यवस्थापक प्रशांत जोशी यांनी उद्घाटनप्रसंगी केले. 

विविध योजना आणि अशा प्रकारच्या प्रशिक्षण कार्यक्रमांच्या माध्यमातून महिलांनी उद्योगक्षेत्रामध्ये यशस्वी व्हावे यासाठी अमृत संस्थेचे प्रयत्न सुरू आहेत. अमृत ग्लॅमर प्रशिक्षण हा त्यातील एक भाग आहे. उद्योग करण्याच्या दृष्टीने इच्छुक असलेल्या महिलांचीच निवड यासाठी करण्यात आली आहे. त्यामुळे इथून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर लवकरच स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. या उद्योजकांचे अमृतपेठ ऑनलाइनच्या माध्यमातून सक्षमीकरण करून त्यांच्या व्यवसायाला एक नवी दिशा मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यामुळे या बॅचमधील महिला खूप उत्साही आहेत.

ब्रायडल मेकअप, ग्लॅमर मेकअप, पार्टीवेअर मेकअप, साउथ इंडियन मेकअप, साडी ड्रेपिंग, हेअर स्टाइल या बाबींचे प्रशिक्षण या वर्गात दिले जाणार आहे. दीपाली देसाई या अनुभवी व तज्ज्ञ प्रशिक्षक असल्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांना दर्जेदार प्रशिक्षण मिळणार आहे. सध्याचा मार्केट ट्रेंड व लोकांच्या गरजेनुसार प्रशिक्षण देणार असल्याची ग्वाही प्रशिक्षकांनी दिली आहे. 

अमृत ग्लॅमर प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांनी किंवा या क्षेत्रामध्ये व्यवसाय करण्याचे नियोजन असलेल्या इच्छुकांनी प्रशिक्षणवर्गाला नक्की भेट द्यावी, असे आवाहन अमृत संस्थेकडून करण्यात आले आहे.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Prashant Joshi News publisher name | Date: 01-04-2026 News publication date | Time: 03:41 PM News publication time | Views: 445 Number of times this news has been viewed | District: kolhapur Related district of the news
Publisher: Prashant Joshi News publisher name | Date: 01-04-2026 News publication date | Time: 03:41 PM News publication time | Views: 445 Number of times this news has been viewed | District: kolhapur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement