पुणे मुख्यालयात पार पडला उपक्रम
पुणे : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या पुणे येथील मुख्यालयात अमृतमित्रांसाठी विशेष प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये नागपूर विभागातील विविध जिल्ह्यांमधील अमृतमित्रांनी सहभाग घेतला.
या वेळी अमृतमित्रांनी व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांची भेट घेतली. या वेळी अमृत पर्यटन, अमृत दिशा, अमृत महाराष्ट्र, अमृतवर्ग, अमृत फ्रँचायझी आणि अमृतपेठ या महत्त्वपूर्ण उपक्रमांवर व्यापक चर्चा झाली. आगामी काळात या सर्व उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करून योजनेचा लाभ अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याबाबत यामध्ये मार्गदर्शन करण्यात आले.
हा प्रशिक्षण कार्यक्रम विजय जोशी आणि सौ. सुमेधा देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या प्रशिक्षणामुळे अमृतमित्रांना विविध योजनांची सखोल माहिती आणि पुढील कार्यासाठी नवी दिशा मिळाली. जोशी यांनी अमृतमित्रांच्या कामाचे कौतुक करून पुढील कार्यासाठी आशीर्वाद व प्रोत्साहन दिले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अमृतमित्रांना नव्या ऊर्जेसह काम करण्याची प्रेरणा मिळाली.
नागपूर विभागातून या प्रशिक्षणासाठी रवींद्र श्रीराम श्रौती, निखिल संजय देशपांडे, श्रीरंग खोंड, सतीश नारायणदास, धीरज राठी, पीयूष पुरोहित, वेदान्त मेहता आणि हेमंत चंदावसकर हे अमृतमित्र उपस्थित होते.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment