डॉ. एस. के. एम. मैलानंदन

सामाजिक कार्यासाठी पद्मभूषण

डॉ. एस. के. एम. मैलानंदन मुख्य फोटो
मुख्य फोटो

डॉ. एस. के. एम. मैलानंदन हे तामिळनाडूतील एक प्रसिद्ध भारतीय उद्योगपती, समाजसेवक आणि ग्राहक हक्क कार्यकर्ते आहेत. त्यांचा जन्म १८ जून १९४५ रोजी तामिळनाडूतील इरोड जिल्ह्यातील एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला. ते 'एसकेएम ग्रुप ऑफ कंपनीज' (SKM Group) चे संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष आहेत. त्यांनी विशेषतः कुक्कुटपालन आणि पशुखाद्य उद्योगात मोठी क्रांती घडवून आणली आहे.त्यांनी ग्रामीण भागातील सुशिक्षित आणि अशिक्षित लोकांसाठी स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण केल्या.वर्ल्ड कम्युनिटी सर्व्हिस सेंटर (WCSC) चे ते अध्यक्ष असून, वेदाथिरी महर्षींचे शिष्य म्हणून ते अध्यात्मिक शिक्षण आणि सामाजिक कल्याणासाठी कार्यरत आहेत.

१९९९ मध्ये त्यांनी 'सेवई मय्यम' या सेवा केंद्राची स्थापना केली, ज्याद्वारे गरिबांना शिक्षण आणि औषधोपचार पुरवले जातात. समाजसेवेतील योगदानाबद्दल त्यांना भारत सरकारचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री वर्ष-२०१३ मध्ये मिळाला. सामाजिक कार्य, सार्वजनिक आरोग्य आणि आध्यात्मिक शिक्षण क्षेत्रातील कामगिरीसाठी त्यांची पद्मभूषण २०२६ साठी निवड करण्यात आली आहे. त्यांना नोव्हेंबर २०२५ मध्ये 'ऑनरीस कॉसा डॉक्टरेट' पदवी देऊन गौरविण्यात आले आहे.

(संकलित)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 10-02-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 1 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 10-02-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 1 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement