अमृत संस्थेच्या वतीने वसमत तहसील कार्यालयात लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या पुढाकाराने वसमत तहसील कार्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

अमृत संस्थेच्या वतीने वसमत तहसील कार्यालयात लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी मुख्य फोटो
मुख्य फोटो

वसमत: महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या पुढाकाराने वसमत तहसील कार्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महान राष्ट्रपुरुष, समाजप्रबोधनकार आणि स्वराज्याचे प्रणेते लोकमान्य टिळक यांच्या विचारांचा जागर करण्याच्या उद्देशाने अमृत संस्थेने या कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमात अमृतचे जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत गंगाधर धोतरे यांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी उपस्थितांना लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रभक्ती, शिक्षण, स्वराज्य आणि समाजजागृतीच्या कार्याची माहिती देण्यात आली. त्यांच्या "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" या प्रेरणादायी घोषणेचा आजच्या तरुण पिढीने आदर्श घेऊन राष्ट्रनिर्मितीत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले.

अमृत संस्था विविध सामाजिक, शैक्षणिक, कौशल्य विकास व जनजागृतीपर उपक्रम सातत्याने राबवत असून, राष्ट्रीय महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी निमित्त त्यांच्या विचारांचे संवर्धन करण्यासाठीही पुढाकार घेत आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून वसमत तहसील कार्यालयात हा अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमास तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच अमृत संस्थेचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Shrikant Dhotre News publisher name | Date: 23-07-2026 News publication date | Time: 01:24 PM News publication time | Views: 29 Number of times this news has been viewed | District: Hingoli Related district of the news
Publisher: Shrikant Dhotre News publisher name | Date: 23-07-2026 News publication date | Time: 01:24 PM News publication time | Views: 29 Number of times this news has been viewed | District: Hingoli Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement