अभिजात मराठी भाषा सप्ताहात अमृत हिंगोली जिल्हा कार्यालयाचा उत्स्फूर्त सहभाग

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात आयोजित ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ उपक्रमात महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), हिंगोली जिल्हा कार्यालयाने उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी मराठी भाषेचे महत्त्व, समृद्ध साहित्यिक परंपरा व सांस्कृतिक वारसा याबाबत जनजागृती करण्यात आली. युवक, विद्यार्थी व नागरिकांमध्ये मराठी भाषेविषयी अभिमान व तिच्या संवर्धनाची भावना निर्माण करण्यासाठी विविध उपक्रमांद्वारे सहभाग घेण्यात आला.

अभिजात मराठी भाषा सप्ताहात अमृत हिंगोली जिल्हा कार्यालयाचा उत्स्फूर्त सहभाग मुख्य फोटो
मुख्य फोटो

हिंगोली : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यात आयोजित ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ उपक्रमात महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), हिंगोली जिल्हा कार्यालयाने उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. मराठी भाषा ही महाराष्ट्राच्या संस्कृती, परंपरा, साहित्य आणि सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मराठी भाषेचा समृद्ध इतिहास, प्राचीन साहित्यपरंपरा आणि अभिजात भाषेचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने सप्ताहादरम्यान विविध उपक्रमांमध्ये अमृत कार्यालयाच्या वतीने सहभाग घेण्यात आला. यावेळी मराठी भाषेचा प्रचार, प्रसार व संवर्धन, तसेच युवक व विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेविषयी अभिमान निर्माण करण्याबाबत जनजागृती करण्यात आली. विविध शैक्षणिक संस्था, विद्यार्थी, युवक तसेच नागरिकांशी संवाद साधून मराठी भाषेचे महत्त्व, तिची साहित्यिक परंपरा आणि दैनंदिन जीवनात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. अमृतच्या माध्यमातून जिल्ह्यातील युवक, विद्यार्थी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी विविध योजना, प्रशिक्षण व मार्गदर्शन उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांसोबतच मराठी भाषा, संस्कृती आणि सामाजिक मूल्यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी अमृत कार्यालयाकडून सातत्याने विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ हा केवळ भाषेचा उत्सव नसून मराठीच्या वैभवशाली परंपरेची जाणीव करून देणारा आणि पुढील पिढीपर्यंत मराठी भाषेचा वारसा पोहोचविणारा उपक्रम आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून ‘मराठीचा अभिमान – मराठीचा सन्मान’ ही भावना जनमानसात रुजविण्यासाठी अमृत हिंगोली जिल्हा कार्यालयाने महत्वपूर्ण सहभाग नोंदविला.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत  अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/




Publisher: Shrikant Dhotre News publisher name | Date: 07-10-2026 News publication date | Time: 02:00 PM News publication time | Views: 82 Number of times this news has been viewed | District: Hingoli Related district of the news
Publisher: Shrikant Dhotre News publisher name | Date: 07-10-2026 News publication date | Time: 02:00 PM News publication time | Views: 82 Number of times this news has been viewed | District: Hingoli Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement