'अमृत'च्या प्रशिक्षणामुळे अमरावतीतील अमोल सिंह बनले ड्रोन पायलट

एक रुपयाही खर्च न करता घेता आले दर्जेदार, महागडे प्रशिक्षण

'अमृत'च्या प्रशिक्षणामुळे अमरावतीतील अमोल सिंह बनले ड्रोन पायलट मुख्य फोटो
'अमृत'च्या प्रशिक्षणामुळे अमरावतीतील अमोल सिंह बनले ड्रोन पायलट अतिरिक्त फोटो

अमरावती : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. या संस्थेच्या ड्रोन प्रशिक्षणाचा लाभ अमरावतीच्या वरुड तालुक्यातील रहिवासी अमोल टियान सिंह यांनी घेतला आहे. कृषी क्षेत्रातील ड्रोन वापरविषयक ड्रोन पायलट प्रशिक्षण त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे.

रायगड येथील प्रशिक्षण केंद्रात १६ ते २५ जानेवारी या कालावधीत हे विशेष प्रशिक्षण पार पडले. या प्रशिक्षणामध्ये कृषी क्षेत्रात ड्रोनचा प्रभावी वापर, पीक सर्वेक्षण, फवारणी, आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीत उपयोग आदी बाबींचे प्रशिक्षण देण्यात आले.

प्रशिक्षण कालावधीत अमोल टियान सिंह यांना ड्रोनविषयक सैद्धांतिक ज्ञानासोबतच सिम्युलेटरवर आणि मैदानावर ड्रोन हाताळण्याचा प्रत्यक्ष अनुभव देण्यात आला. प्रशिक्षणाच्या शेवटी परीक्षा घेण्यात आली आणि त्यामध्ये यशस्वी झाल्यानंतर त्यांना अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

अमृत संस्थेशी बोलताना अमोल टियान सिंह यांनी सांगितले, की 'अत्यंत महागडे व दर्जेदार असे हे प्रशिक्षण अमृत संस्थेमुळे मोफत घेता आले. या प्रशिक्षणाचा उपयोग भविष्यात कृषी क्षेत्रात स्वयंरोजगारासाठी होणार आहे.'

युवकांनी अमृत संस्थेच्या विविध प्रशिक्षणांचा आणि योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

अधिक माहितीसाठी संपर्क :

केदार गोगरकर - 9112227635 

अमरावती जिल्हा व्यवस्थापक, अमृत

पत्ता : अमृत विभागीय कार्यालय, घर क्रमांक ३३,

आशीर्वाद बिल्डिंग, विदर्भ हाउसिंग कॉलनी, 

मालटेकडीसमोर, बस स्टँड रोड,

अमरावती - ४४४६०२

अमृत संस्थेविषयी :

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in


Publisher: केदार दीपक गोगरकर News publisher name | Date: 09-02-2026 News publication date | Time: 10:53 AM News publication time | Views: 322 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news
Publisher: केदार दीपक गोगरकर News publisher name | Date: 09-02-2026 News publication date | Time: 10:53 AM News publication time | Views: 322 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words