बोरिवलीतील अस्थिव्यंग चिकित्सा व पुनर्वसन केंद्र

दिव्यांगांच्या पुनर्वसनाचे कार्य करणारी संस्था

बोरिवलीतील अस्थिव्यंग चिकित्सा व पुनर्वसन केंद्र मुख्य फोटो
बोरिवलीतील अस्थिव्यंग चिकित्सा व पुनर्वसन केंद्र अतिरिक्त फोटो

बोरिवलीतील अस्मिता (संस्था) संचालित मनोहर हरिराम चोगले अस्थिव्यंग चिकित्सा व पुनर्वसन केंद्र १९९० सालापासून दिव्यांगांना विविध कलात्मक वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांच्या पुनर्वसनाचे कार्य यशस्वीरीत्या करत आहे. हे प्रशिक्षण हस्तकला, चित्रकला व शिवण या तीन विभागात दिले जाते. शिवण विभागात विविध प्रकारच्या बॅग, साडी कव्हर, शर्ट कव्हर व इतर कलात्मक वस्तूंचे प्रशिक्षण दिले जाते. त्या वस्तूंच्या विक्रीतून होणाऱ्या अर्थार्जनाचा काही भाग विद्यार्थ्यांना मानधन स्वरूपात दिला जातो. त्यामुळे येथील विद्यार्थी स्वावलंबी होतात व त्यांच्यातील आत्मविश्वास वाढतो. केंद्रात तयार होणाऱ्या सर्व वस्तू अत्यंत सुंदर व कलात्मक असतात तसेच वस्तूंची गुणवत्ताही उत्तम असते. त्यामुळे बाजारात या वस्तूंना भरपूर मागणी असते. डिसेंबर २०२१पासून अद्ययावत उपकरणांनी सज्ज अशा फिजिओथेरपी सेंटरची नव्याने सुरुवात झाली असून, तेथे नाममात्र दरात उपचारांची सुविधा उपलब्ध आहे.

पत्ता :

अस्मिता संचालित

मनोहर हरिराम चोगले अस्थिव्यंग चिकित्सा व पुनर्वसन केंद्र, 

कल्याणी केंद्र, हनुमान टेकडी, बोरिवली पूर्व मुंबई - ६६

Publisher: Rajesh Pawar News publisher name | Date: 08-02-2026 News publication date | Time: 07:59 PM News publication time | Views: 74 Number of times this news has been viewed | District: mumbai_city Related district of the news
Publisher: Rajesh Pawar News publisher name | Date: 08-02-2026 News publication date | Time: 07:59 PM News publication time | Views: 74 Number of times this news has been viewed | District: mumbai_city Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words