निःस्वार्थ सेवेबद्दल यंदा पद्मश्री सन्मान जाहीर झालेले समाजसेवक
जनार्दन बापूराव बोथे (जनार्दन बोथे गुरुजी) हे अमरावती जिल्ह्याच्या तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोझरी येथील एक ख्यातनाम समाजसेवक आहेत. त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील निःस्वार्थ सेवेसाठी भारत सरकारने त्यांना २०२६ या वर्षाचा 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर केला आहे. ते गुरुकुंज मोझरी येथील 'अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे' सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचे आणि कार्याचे ते निष्ठावान संवाहक मानले जातात. त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आदिवासी आणि दुर्गम भागांत ११ निवासी शाळा व वसतिगृहे सुरू केली आहेत. त्यातून हजारो विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत आहे. त्यांनी ग्रामीण भागात योगासनांचा प्रसार करण्यासोबतच शिक्षण, राष्ट्रजागृती आणि शिस्तबद्ध संस्कारांवर भर दिला आहे.
(संकलित)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment