संत श्री गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त नांदेडमध्ये 'सकळ सिद्धी गजानन' कार्यक्रम

नऊ फेब्रुवारीला होणार भक्ती आणि संगीताचा अनोखा आविष्कार

संत श्री गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त नांदेडमध्ये 'सकळ सिद्धी गजानन' कार्यक्रम मुख्य फोटो
संत श्री गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त नांदेडमध्ये 'सकळ सिद्धी गजानन' कार्यक्रम अतिरिक्त फोटो

नांदेड : संत श्री गजानन महाराजांचा प्रकटदिन माघ वद्य सप्तमी अर्थात आठ फेब्रुवारी २०२६ रोजी आहे. त्या निमित्ताने नांदेडमध्ये ललित कला प्रतिष्ठानने नऊ फेब्रुवारीला 'सकळ सिद्धी गजानन' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. संत श्री दासगणू महाराजांनी रचलेल्या गजानन विजय ग्रंथामधील २१व्या अध्यायावर आधारित भक्ती आणि संगीताचा अनोखा संगम असलेला हा कार्यक्रम सायंकाळी सहा वाजता डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात होणार आहे. कार्यक्रमासाठी सर्वांना विनामूल्य प्रवेश आहे.

कार्यक्रमाची संकल्पना आणि निर्मिती मृणाल राजूरकर यांची आहे. कवी देविदास फुलादरी यांच्या गीतांना आनंदी विकास यांनी संगीत दिले असून, कार्यक्रमात अ‍ॅड. गजानन पिंपरखेडे यांचे निरूपण असेल. पुण्यातील साईप्रसाद पांचाळ, विलिना पात्रा आणि छत्रपती संभाजीनगरमधील वैभव पांडे आणि वर्षा जोशी हे गायक या वेळी गीतांचे सादरीकरण करणार आहेत.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण कार्यक्रमाचे अध्यक्ष असून, राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. भाजपचे नांदेड महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर, माजी मंत्री डी. पी. सावंत, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यासह अनेक मान्यवर या वेळी उपस्थित राहणार आहेत.

Publisher: विश्वेश्वर वासुदेव जोशी News publisher name | Date: 06-02-2026 News publication date | Time: 02:16 PM News publication time | Views: 123 Number of times this news has been viewed | District: nanded Related district of the news
Publisher: विश्वेश्वर वासुदेव जोशी News publisher name | Date: 06-02-2026 News publication date | Time: 02:16 PM News publication time | Views: 123 Number of times this news has been viewed | District: nanded Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words