अमृत दुर्गोत्सव २०२६ : ऐतिहासिक व सामाजिक जपणुकीच्या उपक्रमाबाबत नांदेड तहसीलदारांना निवेदन सादर
दुर्गोत्सव २०२६ : अमृत कार्यालयाकडून मा. तहसीलदार संजय वारकड यांना अधिकृत निवेदन सादर
नांदेड:
‘अमृत दुर्गोत्सव २०२६’ या उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक व ऐतिहासिक वारशाची जपणूक करण्याच्या उद्देशाने अमृत कार्यालय, नांदेडच्या वतीने मा. तहसीलदार श्री. संजय वारकड यांना अधिकृत निवेदनपत्र देण्यात आले.
अमृत नांदेड जिल्ह्याचे उपव्यवस्थापक श्री. विश्वेश्वर जोशी आणि अमृत मित्र श्री. विश्वास बदापुरकर यांनी मा. तहसीलदार नांदेड यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी ‘अमृत दुर्गोत्सव २०२६’ या उपक्रमाची सविस्तर माहिती देऊन, याद्वारे राबवल्या जाणाऱ्या सामाजिक उपक्रमांची तसेच ऐतिहासिक व सांस्कृतिक मूल्ये जपण्याच्या प्रयत्नांची माहिती दिली.
उपक्रमाचे महत्त्व आणि त्यामागील सामाजिक उद्देश विचारात घेऊन मा. तहसीलदार श्री. संजय वारकड यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद नोंदवला तसेच उपक्रमाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment