भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघाच्या उमरी तालुका अध्यक्षा श्रीमती प्रणिता जोशी यांची भेट

‘अमृत’च्या माध्यमातून उमरीत EDP प्रशिक्षण व ‘अमृत पेठ’ सुरू करण्यावर चर्चा.

भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघाच्या उमरी तालुका अध्यक्षा श्रीमती प्रणिता जोशी यांची भेट मुख्य फोटो
भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघाच्या उमरी तालुका अध्यक्षा श्रीमती प्रणिता जोशी यांची भेट अतिरिक्त फोटो

भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघाच्या उमरी तालुका अध्यक्षा श्रीमती प्रणिता जोशी यांची भेट; ‘अमृत’च्या माध्यमातून उमरीत EDP प्रशिक्षण व ‘अमृत पेठ’ सुरू करण्याबाबत चर्चा.

उमरी (नांदेड)

भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघाच्या उमरी तालुका अध्यक्षा श्रीमती प्रणिता शरद जोशी यांची ‘अमृत’ नांदेडचे उपव्यवस्थापक श्री. विश्वेश्वर जोशी यांनी नुकतीच सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी ‘अमृत’ संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती श्रीमती जोशी यांना दिली.

या महत्त्वपूर्ण बैठकीत प्रामुख्याने उमरी येथे ‘EDP’ (उद्योजकता विकास कार्यक्रम - Entrepreneurship Development Programme) प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्याबाबत आणि उमरी येथे ‘अमृत पेठ’ सुरू करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. या उपक्रमांमुळे स्थानिक स्तरावर उद्योजकतेला चालना मिळेल आणि महिला व युवकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

या प्रसंगी श्री. शरद जोशी आणि नांदेड जिल्ह्याचे ज्येष्ठ पत्रकार श्री. नरेंद्र येरावार यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. या उपक्रमांच्या माध्यमातून उमरी तालुक्यात नवीन व्यावसायिक व सामाजिक उपक्रम सुरू होण्यास गती मिळेल, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत  अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/




Publisher: विश्वेश्वर वासुदेवराव जोशी News publisher name | Date: 22-10-2026 News publication date | Time: 03:55 PM News publication time | Views: 16 Number of times this news has been viewed | District: Nanded Related district of the news
Publisher: विश्वेश्वर वासुदेवराव जोशी News publisher name | Date: 22-10-2026 News publication date | Time: 03:55 PM News publication time | Views: 16 Number of times this news has been viewed | District: Nanded Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement