'स्नेहालय'च्या माध्यमातून मोठे कार्य उभारणारे गिरीश कुलकर्णी

अहिल्यानगरमधील पथदर्शी आणि प्रेरक प्रकल्प

'स्नेहालय'च्या माध्यमातून मोठे कार्य उभारणारे गिरीश कुलकर्णी मुख्य फोटो
'स्नेहालय'च्या माध्यमातून मोठे कार्य उभारणारे गिरीश कुलकर्णी अतिरिक्त फोटो

गिरीश कुलकर्णी यांनी अहिल्यानगर शहरात १९८९ साली स्नेहालय या सार्वजनिक विश्वस्त संस्थेची स्थापना केली. वंचित आणि संकटग्रस्त महिला, मुले, झोपडपट्ट्या, लाल बत्ती विभाग, अनाथ मुले, एचआयव्हीबाधित व्यक्ती, अनैतिक मानवी वाहतूक, चारित्र्यवान युवक घडवणे, मानसिक आरोग्य, पर्यावरण, सामाजिक ऐक्य अशा विषयांत गेली ३५हून अधिक वर्षे पथदर्शी कार्य या संस्थेमार्फत गिरीश कुलकर्णी करत आहेत.

संस्थेच्या माध्यमातून उभारलेले सेवाकार्य प्रचंड व्यापक असून, खाली दिलेल्या यादीवरून ही व्यापकता स्पष्ट होईल.

- स्नेहालय पुनर्वसन संकुल 

- स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र 

- संकटग्रस्त महिलांसाठी स्नेहाधार 

- लालबत्तीमधील स्नेहज्योत 

- जगण्याची जिद्द देणारे हिंमतग्राम

- संपूर्ण सुरक्षा केंद्र 

- झोपडपट्ट्यांतील प्रेरणादीप बालभवन

- केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर 

- वंचितांना दर्जेदार शिक्षण देणारे स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल 

- दिव्यांगांची आशा - स्पर्श प्रकल्प 

- रेडिओ - नगर एफएम 

- दिव्यांगांसाठी - अनाम प्रेम संस्था 

- युवनिर्माण प्रकल्प 

- स्नेहदीप रुग्णसेवा केंद्र 

- सक्षमा प्रकल्प 

- कोरोना काळातील मिशन राहत 

- विद्या सहयोग योजना 

- मानसग्राम प्रकल्प 

- बालहक्क रक्षणाचा उडान प्रकल्प 

- स्पर्धा परीक्षा केंद्र - कौशल्य विकास केंद्र 

- पर्यावरणीय प्रकल्प - मियावाकी जंगल 

- अहिल्यानगर कम्युनिटी हेल्थ सेंटर

अशा विविध माध्यमांतून गिरीश कुलकर्णी समाजहिताचे व्यापक कार्य करत आहेत. त्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचे कार्य खूप प्रेरणादायक आहे. त्यांच्या कार्याला सलाम.

Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 05-02-2026 News publication date | Time: 10:35 AM News publication time | Views: 205 Number of times this news has been viewed | District: ahilyanagar Related district of the news
Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 05-02-2026 News publication date | Time: 10:35 AM News publication time | Views: 205 Number of times this news has been viewed | District: ahilyanagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words