एड्स जनजागृतीसाठी अहोरात्र मेहनत घेणारे व्यक्तिमत्त्व
काही काही आजार असे असतात, की ज्यांच्याबद्दल बोलणेसुद्धा टाळले जाते. त्यामुळे अशा आजारांविषयी जनजागृती करणे अत्यंत महत्त्वाचे असते. हे महत्त्वाचे काम करत आहेत नाशिकमधील बाजीराव सोनावणे.
२००० साली त्यांनी एड्सवर जनजागृती मोहीम सुरू केली. त्या वेळी माहितीचा अभाव खूप होता. लोक एड्सचा उल्लेख करण्यास किंवा पुढे येण्यासाठी कचरत होते. ही परिस्थिती पाहून त्यांनी या विषयावर तीन पुस्तके लिहिली आहेत. आतापर्यंत त्यांनी तीस हजार पुस्तकांचे वाटप केले आहे. त्यांच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे अनेक माध्यमातून कौतुक होत आहे.
(संकलित)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment