अहिल्यानगरमध्ये मोबाइल फिल्म-मेकिंग कार्यशाळेला चांगला प्रतिसाद

पुढच्या बॅचसाठी नावनोंदणी करण्याचे अमृत संस्थेचे आवाहन

अहिल्यानगरमध्ये मोबाइल फिल्म-मेकिंग कार्यशाळेला चांगला प्रतिसाद मुख्य फोटो
अहिल्यानगरमध्ये मोबाइल फिल्म-मेकिंग कार्यशाळेला चांगला प्रतिसाद अतिरिक्त फोटो

अहिल्यानगर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. लक्ष्यित गटातील घटकांना स्वतःच्या पायावर उभे करण्याच्या उद्देशाने अमृत संस्थेमार्फत विविध मोफत व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. याअंतर्गत अहिल्यानगरमध्ये नुकताच मोबाइल फिल्म-मेकिंग प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला असून, पुढच्या बॅचसाठी नावनोंदणी सुरू झाली आहे. 

सध्या सुरू झालेल्या मोबाइल फिल्म-मेकिंग प्रशिक्षण कार्यक्रमात १२ जण सहभागी झाले आहेत. त्यात सौरभ जोजार, संजना खिस्ती, सुजल झुंजारे, सायली कुलकर्णी, अजय जोशी, अनिरुद्ध अनवणे, सृष्टी डांगे, देवांग कुलकर्णी, सुधीर नगरकर, समर्थ शेटे, प्रसाद देशपांडे आणि पूर्वा कमलापूरकर यांचा समावेश आहे. पुढच्या बॅचसाठी अहिल्यानगरमधील इच्छुकांनी नोंदणी करून सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृत संस्थेचे अहिल्यानगर जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी केले आहे. 

प्रशिक्षणानंतर स्वयंरोजगार सुरू करता येणार असून, रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी वेळ न दवडता अमृत कार्यालयाशी संपर्क साधून या प्रशिक्षण योजनांचा लाभ घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे. अमृत संस्थेच्या कार्यालयात सागर भोपे, वैभव कुलकर्णी, गौरी कुलकर्णी व शरद क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधून अधिक माहिती मिळू शकते.

मोबाइल : 9112228769.

कार्यालय पत्ता : अमृत, वरुण अपार्टमेंट,

आकाशवाणी केंद्रासमोर, सावेडी, 

अहिल्यानगर - 414003

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 02-02-2026 News publication date | Time: 10:22 AM News publication time | Views: 181 Number of times this news has been viewed | District: ahilyanagar Related district of the news
Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 02-02-2026 News publication date | Time: 10:22 AM News publication time | Views: 181 Number of times this news has been viewed | District: ahilyanagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words