अमर विवेक अग्रवाल

दर ९० दिवसांनी रक्तदान करणारे वकील

अमर विवेक अग्रवाल मुख्य फोटो
मुख्य फोटो

रक्तदान हे श्रेष्ठदान मानले जाते. आपल्या देशाची जनता जवळपास १४० कोटी आहे. इतकी मोठी लोकसंख्या असूनसुद्धा अजूनही आपल्या देशाच्या अनेक भागांत रक्ताची कमतरता भासते. आपण सगळे या विषयावर बोलतो, चर्चा करतो, रक्ताचे नियोजन करणे कसे महत्त्वाचे आहे, हे आपल्याला कळत असते. असे असले, तरी या सगळ्यावर उपाय म्हणून जी गोष्ट करणे आपल्याला सहज शक्य असते, तीच आपण करत नाही. ते म्हणजे रक्तदान. आपल्या अवतीभवती मात्र अशी काही माणसे आहेत, जी या विषयाचा उपाय म्हणून नियमित रक्तदान करतात. अशीच एक व्यक्ती म्हणजे चंदीगड येथील अमर विवेक अग्रवाल.

अमर विवेक अग्रवाल हे चंदीगड येथील एक प्रसिद्ध वकील आणि समाजसेवी व्यक्तिमत्त्व आहेत. ते पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात प्रदीर्घ काळापासून वकिली करत आहेत. ते 'AVSAI Legal' या फर्मचे संस्थापक भागीदार आहेत आणि त्यांनी हरियाणाचे माजी अतिरिक्त महाधिवक्ता म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. त्यांनी पंजाब विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळवली असून, श्री सत्य साई इन्स्टिट्यूट ऑफ हायर लर्निंगमधून MBA पूर्ण केले आहे. ते केवळ वकीलच नाहीत, तर एक सक्रिय समाजसेवक आहेत. त्यांनी मोहालीजवळील कुरारी गावात श्री सत्य साई मानव सेवा मोफत रुग्णालय सुरू केले आहे. तसेच ते ग्रामीण भागातील मुलांसाठी मोफत शिक्षण आणि कौशल्यविकास प्रशिक्षणाचे उपक्रम राबवतात. त्यांनी आतापर्यंत १७६ वेळा रक्तदान केले आहे. १९८१पासून चाललेले त्यांचे हे कार्य अजूनही अविरत चालू आहे. त्यांनी आतापर्यंत शेकडो लोकांना या पवित्र कार्यासाठी प्रवृत्त केले आहे. त्यांना या कार्याची प्रेरणा त्यांच्या वडिलांकडून मिळाली, असे ते म्हणतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय स्तरावर गौरवण्यात आले आहे.

(संकलित)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 31-01-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 1 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 31-01-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 1 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement